टेंभूच्या पाण्यामुळे माण नदीच्या काठावरील शेतकऱ्यांसाठी सोन्याचा दिवस उगवल्याने माझे स्वप्न साकार – आम.शहाजीबापू पाटील

सांगोला :

सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्यासाठी चळवळ उभी करुन संघर्ष केला,आंदोलनं झाली,जनावरांसह उपोषणं करण्यात आली.पण,खर्‍या अर्थाने टेंभूच्या पाण्यामुळे माण नदीकाठावरील शेतकऱ्यांसाठी आज सोनियाचा दिवस उगवल्याने माझे स्वप्न साकार झाले आहे.तरी परंतु,विरोधक मात्र,आजही गणिते करु पाहत आहेत,गणित समजून घ्यायचे असेल तर माझ्याकडे या,तुमच्या आजोबाला जे जुळलं नाही,ते तुम्हाला कुठलं जमायचं ? नादाला लागू नका,आमचं आम्ही गणित करतो पण,काळजी करु नका,माण नदीचा तळ तुम्हाला कांही दिसू देत नाही,हा शब्द दीपकआबा आणि मी तुम्हाला देतो,असे आवाहन पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांनी वाटंबरे येथील नागरी सत्कारप्रसंगी आपल्या परंपरागत विरोधकांना केले.

सांगोला तालुक्यातील १९ वंचित गावांना १ टीएमसी व माण नदीवरील सर्व १६ बंधारे वर्षातून ३ वेळा भरण्यासाठी ०.६०० एमसीएफटी असे एकूण १.६०० टीएमसी पाणी नव्याने मंजूर केल्याबद्दल,वाटंबरे (ता.सांगोला) येथील ग्रामस्थ व लाभधारक शेतकऱ्यांच्या वतीने पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांचा नुकताच फेटा बांधून,शाल व पुष्पहार घालून भव्य नागरी सत्कार करण्यात आला,या सत्कारास उत्तर देताना ते बोलत होते.यावेळी,व्यासपीठावर ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड,तानाजी पाटील,संभाजी आलदर,  प्रा.संजय देशमुख,विजय शिंदे,सुभाष इंगोले,सरपंच किरण पवार,सागर पाटील,गुंडा खटकाळे,दादासाहेब लवटे,आनंद घोंगडे,समीर पाटील,अमोल नलवडे, विजय बाबर,दिपक पवार,महादेव पवार,विजय पवार, शहाजी घाडगे,दिपक दिघे,सुर्यकांत पवार,सुब्राव पवार, बिरा गेजगे,जलदूत मधुकर पवार,दिनेश धनवडे,अनिल पवार,धीरज पवार यांचेसह शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व आरपीआयचे पदाधिकारी,कार्यकर्ते,ग्रामस्थ व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                            यावेळी माजी आमदार दीपकआबा म्हणाले की,पाण्याची खरी सुरुवात सन १९७२ साली कै.काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या रुपाने झाली परंतु काळाने त्यांना हिरावून घेतले. त्यानंतर गेल्या ५ वर्षाच्या काळात तालुक्याच्या विकासाच्या पर्वाला चांगला मुहूर्त मिळाला.मी आणि बापू दोघे मिळून विकास कामांबाबत निर्णय घेऊन शासन दरबारी पाठपुरावा करतो,आजपर्यंत जेवढी पत्रे सरकारकडे दिली त्यामध्ये,बापू कधी मोकळ्या हाताने परत आले नाहीत.आम्ही सर्व मंजूर करून आणून ठेवले असून भविष्यकाळात लाभधारक शेतकऱ्यांना मात्र,पैसे भरण्याची मानसिकता ठेवून पाण्याची वहिवाट चालू ठेवावी लागेल.आम्ही आणून देण्याचे काम केले ते चालवण्याचे काम तुमचे आहे.शेतकऱ्यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता,पीक पध्दत बदलून शेतीला शिस्त लावली पाहिजे,असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजपचे डॉ.विजय बाबर,प्रा.संजय देशमुख,संभाजी आलदर व विजय शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.तर,प्रास्ताविक विकास पवार यांनी केले.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
जेसीबीतून पुष्पवृष्टी करुन जंगी स्वागत :

वाटंबरे ग्रामस्थ व लाभार्थ्यांच्या वतीने फटाक्याची आतिषबाजी करत हलगीच्या तालावर मिरवणूक काढून पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांचे जेसीबीतून पुष्पवृष्टी करुन जंगी स्वागत केले.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>दीपकआबांच्या साथीने तालुक्यात विकासाचे पर्व उभे राहिले :

मी शंभरवेळा दीपकआबांचे आभार मानतो.त्यांनी मला संधी दिल्यामुळे मी आमदार झालो. म्हणूनच आज तालुक्यात विकासाचा डोंगर उभा करु शकलो अन्यथा, आजही आपला दुष्काळ असाच राहिला असता.जनतेच्या व दीपकआबांच्या साथीने व ताकदीने शिवसेनेच्या माध्यमातून तालुक्यात विकासाचे पर्व उभे राहिले.
                                    – आमदार शहाजीबापू पाटील
——————————————————————————