सांगोला :
स्व.भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ सोलापूर जिल्हयासह सांगोला तालुक्यातील कष्टकरी,शेतकरी व जनतेसाठी “गणेशरत्न कृषी महोत्सव २०२४” चे आयोजन डॉ.अनिकेत भैया देशमुख युवा मंचच्या वतीने शुक्रवार दि.१९ जानेवारी ते सोमवार दि.२२ जानेवारी २०२४ या कालावधीत सांगोला येथील डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले असल्याची माहिती डाॅ.अनिकेत देशमुख यांनी दिली.
विशेष बाब ही की,स्व.भाई गणपतराव देशमुख व श्रीमती रतनबाई गणपतराव देशमुख यांच्या नांवाच्या अनुषंगाने या कृषी महोत्सवास “गणेशरत्न” हे नांव देण्यात आले असून या “गणेशरत्न कृषीमहोत्सवाचा” उदघाटन सोहळा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरद पवार,शेकापचे चिटणीस आम.भाई जयंत पाटील व डॉ.सचिन मोटे यांचे उपस्थितीत १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वा.संपन्न होणार आहे. यावेळी राज्यभरातील विविध राजकीय पक्षाचे नेतेमंडळी व मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
जगाचा पोशिंदा समजला जाणारा बळीराजा आज कमालीच्या संकटात आहे.शेती उद्योगासमोर संकटाची
मालिका उभी आहे.निसर्गाचे वेळापत्रक गेल्या दशकात बदलून गेले आहे.कधी दुष्काळ,कधी अतिवृष्टी तर,कधी वेगवेगळ्या उदभवणाऱ्या रोगराईंमुळे शेती व्यवस्थापनावर गंभीर परिणाम झाला आहे.स्व.आमदार गणपतराव देशमुख यांनी प्रयत्न करुन १९८४ साली या भागांमध्ये शंभर टक्के अनुदानावर फळबाग लागवड योजना राबविली. त्याचा परिणाम असा झाला की,या तालुक्यांमध्ये डाळिंबाच्या माध्यमातून क्रांती घडली पण,या डाळिंबावर आलेल्या तेल्या व मर रोगामुळे शेतकर्यांच्या बागाही उध्वस्त झाल्या. या भागातील शेतकरी हैराण झाला.त्यांच्यासाठी विविध पिकांची तसेच कृषी क्षेत्रातील अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती सहज उपलब्ध व्हावी म्हणूनच,सांगोला येथे हा “गणेशरत्न कृषी महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे.
तरी,या कृषी प्रदर्शनास राज्यभरातील शेतकर्यांसह सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी व विशेषतः सांगोला तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा,असे आवाहन संयोजक डॉ.अनिकेत भैया देशमुख युवा मंचच्या वतीने करण्यात आले आहे.
—————————————————————————
कृषी महोत्सवाची वैशिष्ठ्ये :
*प्रदर्शनामध्ये २ ते ३ लाख शेतकर्यांची भेट
* आधुनिक शेती करत असलेल्या भागातील भव्य प्रदर्शन * मल्टी मिडीया प्रसिध्दी
* कृषी संबंधित अनेक महत्वाच्या संस्थांचा सहभाग
* वेगाने विकसित होणाऱ्या अत्यंत महत्वाच्या अशा ग्रामीण बाजारपेठेत प्रवेश * नवीन उद्योगधंद्यांच्या प्रचंड उलाढाली * शेतकरी ग्राहकांना थेट भेटण्याची सुवर्णसंधी * आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख शेतकऱ्यांना करुन देण्याची सुसंधी * थेट संवादाद्वारे शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्याची व त्यानुसार उत्पादनात बदल करण्याची संधी * महाराष्ट्रभर प्रदर्शनाच्या प्रसिध्दीचे प्रभावी नियोजन * पिकांच्या वाढीसाठी चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन.
——————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने