सांगोल्याच्या महिला सूतगिरणीत शेकापची एकहाती सत्ता

सांगोला :

            माजी मंत्री स्व.भाई गणपतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वीत झालेल्या सांगोला येथील शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूतगिरणीच्या नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे सर्वच्या सर्व १९ उमेदवार मोठ्या मताधिक्याच्या फरकाने निवडून आले असून या निवडणुकीत शेकापच्या २ महिला उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या असल्यामुळे २१ पैकी २१ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व निर्माण करत शेकापने महिला सूतगिरणीत एकहाती सत्ता काबीज केल्याने शेकापच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूतगिरणीच्या निवडणुकी च्या २१ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असता,अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी संस्था मतदार संघातून व भटक्या विमुक्त मतदारसंघातून प्रत्येकी एकच अर्ज आल्याने शेकापचे दोन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित १९ जागांसाठी रविवार दि.७ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आणि सोमवारी ८ जानेवारी रोजी मतमोजणी होवून शेकापचे सर्व १९ उमेदवार बहुमताने निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत टिकुळे यांनी जाहीर केले.

 सर्व उमेदवार निवडून आल्यानंतर शेकापच्या हजारो कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिशबाजी करत गुलालाची मुक्तपणे उधळण केली तर,सर्व विजयी उमेदवाराचे डॉ.अनिकेत व डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.
—————————————————————————

शेकापचे निवडून आलेले विजयी उमेदवार :

कापूस उत्पादक शेतकरी महिला मतदार संघ :

* बाबर वंदना तानाजी,पाटील शुभांगी सयाजीराव, हजारे शालन महादेव,रसाळ शोभा सुरेश,वाघमोडे उज्वला संजय,बंडगर विमल सुब्राव,खतीब शबाब जमीद,पाटील मालन विष्णू,मदने सुरेखा संजय, कोळेकर छाया सोपान,यमगर मायाक्का मायाप्पा.

* बिगर कापूस उत्पादक शेतकरी महिला मतदार संघ :

ढोबळे प्रतिभा शिवाजीराव,जोशी नम्रता नागेश,भगत द्रोपदी सोपान,मिसाळ गोकुळाबाई ज्ञानेश्वर,रुपनर आनंदीबाई रंगनाथ,

* सहकारी संस्था मतदारसंघ :
                                                    उषा रवींद्र देशमुख.
* भटक्या जातीजमाती विशेष मागास प्रवर्ग महिला मतदारसंघातून कल्पना प्रकाश शिंगाडे या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

* अनुसूचित जातीजमाती महिला राखीव मतदार संघातून बनसोडे रतन संभाजी व बनसोडे स्मिता किशोर या निवडून आल्या आहेत.

* इतर मागासवर्गीय महिला प्रतिनिधी मतदारसंघातून राजश्री रामचंद्र जाधव या निवडून आल्या आहेत.
——————————————————————————