महत्वाच्या बातम्या

सांगोला न.पा.कर्मचाऱ्यांसह शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न आम.शहाजीबापूंनी काढला निकाली

सांगोला :

सांगोला नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडे शहराच्या स्वच्छतेसाठी कामावर घेतलेल्या सुमारे १३० कर्मचाऱ्यांच्या टेंडरची मुदत नोव्हेंबर अखेर संपल्यामुळे या कर्मचार्‍यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता.त्याचबरोबर,शहरातील कचरा व स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या बाबीची दखल घेवून आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला येथील आपल्या संपर्क कार्यालयात मुख्याधिकारी व सफाई कामगार यांची संयुक्त बैठक आयोजित करुन मुदत संपलेल्या टेंडरची नव्याने प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आहे त्याच सर्वच्या सर्व १३० कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देवून त्यांना कामावर रुजू करुन घेण्याच्या सूचना नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांना दिल्या आणि सफाई कर्मचाऱ्यांसह शहराच्या स्वच्छतेचा प्रश्नही आमदार शहाजीबापूंनी निकाली काढला.

         सदर बैठकीतील चर्चेनंतर सांगोला नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना बुधवारपासून पुन्हा कामावर येण्याचे आवाहन केल्याने सांगोला शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागला.सदर बैठकीस मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी,माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ,गुंडादादा खटकाळे,समीर पाटील,सोमा ठोकळे यांचेसह नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.

——————————————————————————

अधिवेशनामध्ये निधीची मागणी करणार :

सफाई कामगारांबाबत देण्यात येणार्‍या ठेक्यासाठी यापुढे निधी कमी पडू दिला जाणार नाही.यासाठी नागपूर येथे होणार्‍या अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधीची मागणी करणार. – आमदार शहाजीबापू पाटील
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button