महत्वाच्या बातम्या

सांगोला तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आजपासून बेमुदत साखळी उपोषण व धरणे आंदोलन

 

सांगोला :

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी सांगोला तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज शुक्रवार पासून बेमुदत साखळी उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याबाबतचे निवेदन सांगोला तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार यांचेकडे गुरुवारी देण्यात आले.

सांगोला तहसीलदार यांना देण्यात आलेल्या सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, “मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा योध्दा मनोज जरांगे -पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी तसेच सकल मराठा समाज,महाराष्ट्र राज्य यांचेकडील आव्हानास प्रतिसाद देत,सांगोला तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज शुक्रवार पासून सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बेमुदत साखळी उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर,मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू मांडणे व शासनाचा निषेध करणे,या अनुशंगाने वेगवेगळ्या पध्दतीने विवीध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून सांगोला शहर व तालुका मराठा सकल समाजाच्या वतीने सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बेमुदत साखळी उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button