राजकीय

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला शशिकांतभाऊ देशमुख यांचा सत्कार

 

सांगोला :

महाराष्ट्र राज्यातील शेतकर्‍यांच्या अडी-अडचणी जाणून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या नेतृत्वाखाली सध्या राज्यभर दौर्‍याचे नियोजन करण्यात आले असून या दौर्‍यात किसान मोर्चाचे प्रदेश कोषाध्यक्ष शशिकांतभाऊ देशमुख हेही सहभागी आहेत. किसान मोर्चाच्या वतीने आयोजित केलेल्या मराठवाडा दौर्‍याचे दरम्यान, केंद्रीय रेल्वेमंत्री ना.रावसाहेब दानवे-पाटील यांनी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे व प्रदेश कोषाध्यक्ष शशिकांतभाऊ देशमुख यांचा यथोचित सत्कार केला.

भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाच्या वतीने पश्‍चिम महाराष्ट्राचा दौरा पूर्ण करुन नुकताच मराठवाडा दौरा सुरु करण्यात आला आहे.सदर मराठवाडा दौर्‍याचे दरम्यान, केंद्रीय रेल्वेमंत्री ना.रावसाहेब दानवे-पाटील यांनी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे व प्रदेश कोषाध्यक्ष
शशिकांतभाऊ देशमुख यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार नारायण कुचे व जालना जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button