सांगोला :
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी कृषी पणन व रोहयो मंत्री स्व.भाई गणपतराव देशमुख यांचे स्मारक (पुतळा) अनावरण व महाविद्यालयाचा नामांतरण सोहळा रविवारी १३ ऑगस्ट रोजी दुपारी न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनि. कॉलेज व डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालय,सांगोला या शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती न्यू इंग्लिश स्कूल,ज्युनि.कॉलेज व डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे संचालक तसेच स्व.गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ.अनिकेत देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेसाठी स्व.आबासाहेबांचे जेष्ठ चिरंजीव पोपटराव देशमुख,प्रशालेचे सचिव विठ्ठलराव शिंदे,प्राचार्य सिकंदर मुलाणी,सूतगिरणीचे संचालक अवधूत कुमठेकर,डॉ.बाळकृष्ण जगताप, प्रशांत वलेकर,हणुमंत कोळवले,बाळकृष्ण कोकरे आदी उपस्थित होते. स्व.भाई गणपतराव देशमुख यांचे स्मारक अनावरण व महाविद्यालयाचे नामांतरण सोहळ्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा.शरद पवार हे असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले,माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालक मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,शेकापचे सरचिटणीस आ.जयंतराव पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील,विधान परिषदेचे माजी सभापती आ.रामराजे निंबाळकर,माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील,शेकापचे आम.बाळाराम पाटील आदी उपस्थित राहणार असल्याचे डाॅ.अनिकेत देशमुख यांनी सांगीतले.
त्याचबरोबर खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आम.शहाजीबापू पाटील,माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील,आम.बबनदादा शिंदे,आम.सुभाषबापू देशमुख,आम.विजयकुमार देशमुख,आम.प्रणिती शिंदे, आम.अनिल बाबर,आम.संजयमामा शिंदे,आम. समाधान आवताडे,आम.यशवंत माने,आम. रणजितसिंह मोहिते-पाटील,आम.गोपीचंद पडळकर, आम.सचिन कल्याणशेट्टी, आम.राम सातपुते,आम. राजेंद्र राऊत,माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,माजी आमदार आडम मास्तर,माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख,माजी आमदार राजन पाटील,माजी आमदार दिलीप सोपल,माजी आमदार प्रशांत परिचारक,माजी आमदार दिलीप माने,माजी आमदार पंडितशेठ पाटील, पाणी संघर्ष चळवळीचे नेते वैभवकाका नायकवडी, पाणी संघर्ष चळवळीचे नेते शिवाजीराव काळुंगे, पाणी संघर्ष चळवळीचे नेते बाबुराव गुरव,जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद,जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,युवा नेते रोहित (आर.आर.आबा) पाटील, विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील,युवा नेते भगीरथ भालके,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील आदी उपस्थित राहणार असल्याचे सांगून सदर कार्यक्रमासाठी सांगोला शहर आणि तालुक्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन डाॅ. अनिकेत देशमुख यांनी संस्थेच्या वतीने केले आहे.
————————————————
स्व.आबासाहेबांचा पुतळा बनवण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य :
स्व.गणपतराव देशमुख यांचा पुतळा हा ब्रॉन्झ या धातूपासून बनविण्यात आला असून तो ६०० किलो वजनाचा व साडे आठ फूट उंचीचा आहे.सदर पुतळा हा सुमारे २०० वर्षापेक्षा जास्त काळ आहे त्या स्थितीत राहील,असा विश्वास असून हा पुतळा बनवण्याचे काम हे मागील वर्षभरापासून सुरु होते.आजपर्यंत विवीध महापुरुषांसह राजकीय नेतेमंडळींचे पुतळे बनवले असून स्व.आबासाहेबांचा पुतळा बनवण्याची संधी मिळणे,हे मी माझे भाग्य समजतो.
– शिल्पकार गजानन सलगर
—————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने