सामाजिक

माहिती महासंचालक डॉ.ब्रिजेशसिंह यांना प्रकट मुलाखतीसाठी निमंत्रण

 ६ एप्रिल रोजी सावंतवाडी येथे होणाऱ्या डिजिटल मिडिया संघटनेच्या महाअधिवेशनाची जोरदार तयारी

मुंबई/प्रतिनिधी :

                डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्रच्या सावंतवाडी येथे ६ एप्रिल रोजी भोसले नॉलेज सिटी संकुलात होत असलेल्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे तसेच प्रकट मुलाखत देण्याचे निमंत्रण महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक डॉ.ब्रिजेशसिंह यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने व उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत यांनी दिले.

“कृत्रिम बुद्धिमत्ता व आजची पत्रकारिता” या विषयावर प्रस्तावित मुलाखत घेण्याचा मानस असल्याचे डॉ.ब्रिजेशसिंह यांना यावेळी सांगण्यात आले.महाराष्ट्र शासनाच्या तयार होत असलेल्या डिजिटल मिडिया धोरणाविषयीही यासमयी चर्चा झाली.धोरणाच्या मसुद्यासाठी विशेष सूचना असतील तर,त्या देण्याविषयी त्यांनी सूचित केले. यावेळी,राजा माने यांनी राज्यातील डिजिटल पत्रकारांच्या अडचणी व संघटनेच्या वाटचालीबद्दल डॉ.ब्रिजेशसिंह यांना माहिती दिली.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button