महत्वाच्या बातम्या

पु.राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाचा चबुतरा व स्मारकाच्या जागेसाठी सांगोल्यात आंदोलन

 

सांगोला :

सांगोला येथे नगरपरिषदेमार्फत बांधण्यात आलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहा (टाऊन हाॅल) समोर तसेच बाजूस नगरपरिषदे मार्फत व्यापारी संकुलाचे बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तेथे कोणतेही बांधकाम अथवा शाॅपींग सेंटर उभे न करता,पु.अहिल्यादेवी होळकर सभागृहाच्या प्रांगणामध्ये पु.राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुर्णाकृती पुतळा व चबुतरा आणि स्मारकासाठी जागा तसेच निधीही मंजूर करावा,या मागणीसाठी सोमवारी १३ मार्च रोजी अहिल्याप्रेमींच्या वतीने सांगोला तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणीक उपोषण व आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनादरम्यान,पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे तसेच आंदोलनकर्ते तुषार इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले.शासनाच्या सन २०२२-२३ मधील विवरण पत्रामध्ये २२ डिसेंबर २०२२ रोजी मंजूर झालेल्या आ..क्र.२ मधील राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहासमोर व बाजूस
२ कोटी ३० लक्ष एवढ्या रकमेच्या खर्चाचे व्यापारी संकुल बांधणेबाबत मंजूरी मिळाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगरपरिषदेकडील एकूण ३ विकास कामांसाठी रक्कम रुपये ५ कोटी ८० लाख इतका निधी शासनाकडून दि. २२ सप्टेंबर २०२२ रोजी सांगोला नगरपरिषदेसाठी मंजूर झालेला असून तो निधी सध्या जिल्हाधिकारी यांचे कार्यालयाकडे उपलब्ध झालेला आहे. त्या एकूण ३ कामांमधील आ. क्र.२ चे पु.राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहासमोरील बाजूस व्यापारी संकुल बांधणे हे काम आहे. हे काम एकूण रु.२.३० लक्ष एवढया रकमेचे आहे.परंतु तो निधी त्याठिकाणी व्यापारी संकुल बांधण्यासाठी खर्च केला व व्यापारी संकुल उभे राहिले तर, सद्य:स्थितीला त्याठिकाणी असलेला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा झाकला जाणार आहे व स्मारकदेखील झाकले जाणार आहे. असे झाल्यास सांगोलावासीय हे इतिहास पुसण्याचे साक्षीदार होणार आहेत.त्यामुळे, हे व्यापारी संकुल त्या ठिकाणी उभे न करता,त्यासाठी मंजूर झालेला निधी हा पु.अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक सुशोभिकरणासाठी खर्च करणेत यावा,अशी मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली.

               यावेळी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डाॅ.बाबासाहेब देशमुख, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे,युवक नेते प्रताप मस्के,रासपचे आबा मोटे,आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते,युवक नेते प्रमोद ठोंबरे,धनगर समाज मंडळाचे माजी अध्यक्ष नवनाथ शिंगाडे,राहुल मस्के,धनगर समाज मंडळाचे माजी अध्यक्ष दत्ताभाऊ जानकर,युवा उद्योजक किरण पांढरे,शेखर गडहिरे,सरपंच लक्ष्मण मारकर,बाबुराव मेटकरी,नंदकुमार मेटकरी,विष्णू देशमुख,सतीश मोटे, चंद्रकांत चौगुले,शिवसेनेचे नेते रघुनाथ ऐवळे व गोरख येजगर यांचेसह धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button