शशिकांतभाऊ देशमुख यांचेमार्फत भरविण्यात आलेल्या प्रिमीयर लिग क्रिकेट सामन्यांच्या समारोहप्रसंगी मान्यवरांची हजेरी
नरिमन पॉईंट (मुंबई) :
मुंबईतील सिध्देश अपार्टमेंट मधील सर्व परिवारांच्या वतीने भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे राज्य कोषाध्यक्ष शशिकांतभाऊ देशमुख यांच्यामार्फत नरिमन पॉईंट येथील कॅथलीक जिमखाना येथे रविवार दि.१२ मार्च रोजी भरविण्यात आलेल्या प्रिमीयर लिग क्रिकेट सामन्यांच्या समारोह प्रसंगी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सभापती, आमदार राहुल नार्वेकर,माजी मंत्री राज के.पुरोहीत,खासदार अरविंद सावंत, सिध्दीविनायक मंदिर समितीचे सदस्य राजाराम देशमुख,शिवसेना विभाग प्रमुख पांडुरंग सपकाळ,लालबागचा राजाचे ट्रस्टी आदी मान्यवरांनी विशेष हजेरी लावली होती.
भाजपा किसान मोर्चाचे राज्य कोषाध्यक्ष शशिकांतभाऊ देशमुख हे मुंबईत सातत्याने कुस्ती व क्रिकेट सामन्यांची स्पर्धा आयोजित करुन कुस्ती व क्रिकेटशौकिनांना स्पर्धा पाहण्याची मेजवानी देत असतात आणि त्यांच्या या उपक्रमासाठी अनेक मान्यवरही आपली उपस्थिती दर्शवितात.त्यांनी आयोजित केलेल्या या प्रिमीयर लिग क्रिकेट सामन्यांच्या समारोह प्रसंगीही अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.तसेच यावेळी,अनेक उद्योगपती,व्यापारी मंडळी,सिनेकलावंत व सिध्देश अपार्टमेंटचे सर्व रहिवासी सदस्य उपस्थित होते.
—————————————————————————