महत्वाच्या बातम्या

सांगोला सूतगिरणीच्या चेअरमनपदी डाॅ.प्रभाकर माळी

 

सांगोला :

                     स्व.गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या व सहकार क्षेत्रात सांगोला तालुक्याचे नांव उंचावणार्‍या शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या चेअरमनपदी माजी नगराध्यक्ष तथा सांगोला अर्बन बँकेचे संस्थापक/चेअरमन तसेच एक सुस्वभावी व संयमी नेतृत्व म्हणून सर्वश्रूत असलेले डाॅ.प्रभाकर (नाना) माळी यांची तर, व्हा. चेअरमनपदी नितीन गव्हाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सांगोला सूतगिरणीच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली होती. स्वर्गीय गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांच्या निधनानंतर बिनविरोध पार पडलेल्या या निवडणूकीनंतर चेअरमन पदावर कुणाची वर्णी लागणार ? याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. अखेर,चेअरमनपदी डाॅ. प्रभाकर (नाना) माळी यांची तर,व्हा.चेअरमन पदी नितीन गव्हाणे यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली.

सध्या,सूतगिरणीची अवस्था ही बिकट असून गिरणीला उर्जितावस्थेत आणण्यासाठी सहकारी क्षेत्राचा दांडगा अनुभव असणार्‍या व निधी उभा करण्याची क्षमता असणार्‍या व्यक्तीकडेच चेअरमनपदाची सूत्रे असणे गरजेचे होते. त्यानुसार, सूतगिरणीचे पूर्वीपासूनच संचालक असलेले व सूतगिरणीच्या कामकाजाची जाण असणारे स्व.गणपतराव देशमुख यांचे चिरंजीव चंद्रकांतदादा देशमुख यांनी व इतर विद्यमान संचालकांनी डाॅ.प्रभाकर माळी यांची चेअरमनपदी केलेली निवड ही अगदी योग्य व सार्थ असून नुतन चेअरमन डाॅ.माळी यांना सांगोला अर्बन बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्राचा दांडगा अनुभवही आहे आणि सूतगिरणी पुन:श्च सुरु करण्यासाठी निधी उभा करण्याची क्षमताही त्यांच्याकडे असल्याने सांगोला सूतगिरणी पुन्हा निश्चीतपणे उभारी घेईल,अशी आशा करण्यास कांही हरकत नाही.
———————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button