सांगोला :
महाराष्ट्र राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी झाल्याने ऐन काढणीच्या काळातच हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात गेली.त्यामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले असले तरी,अनेक भानगडी करुन सध्या महाराष्ट्रात सत्तेवर आरुढ झालेल्या खोकेबाज सरकारमधील मंत्र्यांजवळ व गुवाहाटी फेम सर्वच आमदारांजवळ मौज मस्ती करायला आणि पातळी सोडून कुणाबद्दल कांहीही बरळून राजकारण करायला भरपूर वेळ आहे पण, नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या व्यथा ऐकायला त्यांना वेळ कुठायं ? असा टोमणा मारुन राज्यात सध्या फक्त सत्ताधार्यांचंच ओक्के असून बाकी सर्व नाॅट ओक्के असल्याची जळजळीत टीका माजी पर्यावरण मंत्री व उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवकनेते आम. आदित्य ठाकरे यांनी सांगोला येथील दौर्यात केली.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सांगोला तालुक्यातील संगेवाडी व मांजरी येथील पिकांची पाहणी करण्याकरिता बुधवारी ९ नोव्हेंबर रोजी माजी मंत्री तथा आम.आदित्य ठाकरे हे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचेसह सांगोला दौर्यावर आले होते. यासमयी,संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे,धनंजय डिकोळे,तालुकाप्रमुख सूर्यकांत घाडगे,शहर अध्यक्ष कमरुद्दीन खतीब,महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख आशाताई टोणपे,ॲड.पूनम अभंगराव,युवा सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश इंगळे,युवा सेनेचे विस्तारक उत्तम ऐवळे, प्रा.लक्ष्मण हाके,शंकर मेटकरी, सुभाष भोसले,तुषार इंगळे,सौरभ चव्हाण, रघुनाथ गायकवाड,समाधान चव्हाण इ.पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आम.आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की,या खोकेबाज सरकारजवळ शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जायला वेळच नसल्यामुळे मी तुमच्या व्यथा समजून घेण्यासाठी इथपर्यंत आलो असून तुमच्या समस्या जाणून घेऊन त्या शासन दरबारी निश्चितपणे मांडेन,असे सांगून आम.आदित्य ठाकरे म्हणाले की, उद्धव ठाकरे या घडीला मुख्यमंत्री असते तर,आत्तापर्यंत त्यांनी महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत जाहीर केली असती.परंतु विद्यमान सरकार हे कोडगे असून त्यांना शेतकर्यांविषयी कसलीही आस्था नाही.या सरकारने एकतर “ओला दुष्काळ जाहीर करावा, नाहीतर या सरकार मधील सर्वच मंत्र्यांनी आपल्या खुर्च्या खाली कराव्यात” असा इशाराच यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिला. यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले की, उद्धव ठाकरे सरकारच्या काळात उद्योगांमधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात झाली होती. परंतु आज या खोकेबाज आणि धोकेबाज सरकारच्या काळात येथील उद्योग महाराष्ट्राबाहेर जात आहेत. मंत्र्यांना बोलण्याची कोणतीही तमा राहिली नसून महिलांचा अनादर केला जात आहे. आज महाराष्ट्र मागे चालला असून यासाठी एका व्यक्तीची राक्षसी प्रवृत्ती कारणीभूत आहे.मुख्यमंत्र्याचे कोणावरही नियंत्रण राहिलेले नसून सरकारविरुद्ध बोलणाऱ्या विरोधात खोट्या केसेस टाकून गुन्हे दाखल करण्याचेच काम हे सरकार करीत आहे. आज राज्यात लोकशाहीला फार मोठा धोका निर्माण झाला असल्याचे मत आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
आम.आदित्य ठाकरे यांनी घेतले स्व.गणपतराव देशमुख यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन :
माजी मंत्री तथा आम.आदित्य ठाकरे यांनी सांगोल्याच्या दौर्यादरम्यान स्व.गणपतराव देशमुख यांच्या सूतगिरणी येथील स्मृतीस्थळावर जावून दर्शन घेतले. यावेळी त्यांचे चंद्रकांतदादा देशमुख तसेच डॉ. बाबासाहेब देशमुख,सचिन देशमुख यांनी स्वागत केले.यावेळी त्यांनी चंद्रकांतदादा देशमुख व सचिन देशमुख यांच्याकडे डॉ.अनिकेत देशमुख यांची आवर्जून विचारपूस केली व त्यांच्या पुढील राजकिय वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
———————————————————————
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक