सांगोला :
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अडीअडचणी व समस्यांचे निराकरण करण्याऐवजी खोक्याच्या जीवावर ओके झालेल्या सरकारमधील कृषीमंत्री अब्दुलसत्तार यांनी संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबाबत बेताल व बेजबाबदारपणे वक्तव्य करुन एका महिला लोकप्रतिनिधीचा घोर अपमान केला असून याची राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी वेळीच दखल घेवून अब्दुल सत्तार यांचेकडून मंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा घ्यावा,अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल,असा गंभीर इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रांतिक उपाध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांनी मंगळवारी सांगोल्यात दिला.
छत्रपती शिवाजी महाराज तसेच शाहू,फुले व आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वारसा विसरलेले राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचे विषयी अर्वाच्य भाषेत बेताल वक्तव्य केल्याचा निषेध जयमालाताईंनी यावेळी बोलताना केला. खास.सुप्रियाताईंचा अब्दुल सत्तार यांनी शिरवाळ भाषेत एकेरी उल्लेख केला, ही बाब गंभीर असून यामुळे खासदार सुप्रियाताई यांचेसह तमाम महिलांचाही घोर अपमान झाला आहे.अशा व्यक्तीला राज्याच्या कृषी मंत्रीपदावर राहण्याचा कसलाही अधिकार नाही. त्यामुळे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेतली पाहिजे.अन्यथा, राष्ट्रवादीच्या महिला या रस्त्यावर उतरतील,असा इशारा जयमालाताई गायकवाड यांनी दिला. यावेळी राष्ट्रवादीच्या वतीने मंत्री अब्दुलसत्तार यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करणारे निवेदन सांगोला तहसीलदार यांना देण्यात आले.
यासमयी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, महिला अध्यक्षा सखुताई वाघमारे, युवक अध्यक्ष अनिल खटकाळे, दत्तात्रय जाधव, चंद्रकांत कारंडे, महादेव पवार,बाळासाहेब शिंदे,विजय पवार,सुनील साळुंखे,दिलीप नागणे,यशवंत खबाले,चंद्रकांत बागल,योगेश खटकाळे, माजी जि.प.सदस्य अनिल मोटे, सतीश काशीद,सूर्याजी खटकाळे, ज्ञानेश्वर शिंदे, संभाजी हरीहर, राज मिसाळ, मच्छिंद्र माने, गिरीश गायकवाड,संतोष पाटील, साहिल इनामदार,सुरेश गावडे,अनिल सुतार,जयवंत नागणे, शिवाजी जावीर,पोपट खाटीक, दीपक जाधव,अजित गोडसे,भूषण बागल,शिवानंद पाटील वकील, असलम पटेल, राहुल ढोले,माजी उपसभापती शोभा खटकाळे, सरस्वती रणदिवे,शशिकला खाडे, शकुंतला खडतरे,सुजाता कांबळे, सरपंच मंगल भुसे, हसीना मुलाणी, मनीषा मिसाळ,जयश्री पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
————————————————————————
कृषीमंत्र्यांचे हे वक्तव्य पुरोगामी महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारे :
आमच्या नेत्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचेबद्दल राज्याच्या कृषीमंत्र्यांनी केलेले बेताल वक्तव्य हे निंदनीय असून त्यांनी अर्वाच्च भाषेत ताईंचा एकेरी उल्लेख करुन त्यांचेसह तमाम महिलांचा अवमान केला आहे. ही बाब पुरोगामी महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी आहे. याची विद्यमान सरकारने गंभीर दखल घेतलीच पाहिजे.
– माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील.
—————————————————————————
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक