सामाजिक

सांगोला येथे भाविक वारकरी मंडळाचे ९ मार्चला राज्यस्तरीय वारकरी संमेलन

 

सांगोला :

“हेचि आम्हा करणे काम | बीज वाढवावे नाम ||” या संत उक्ती प्रमाणे वारकरी संप्रदायातील संत विचाराचे मंथन व्हावे,वारकरी संघटन व्हावे,समाज मनाला स्थिरता मिळावी,या हेतूने भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातून श्री संत नामदेव महाराजांचे १६ वे वंशज ह.भ.प.माधव महाराज नामदास (पंढरपूर) यांच्या अध्यक्षतेखाली व सुधाकर इंगळे महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष) यांचे मार्गदर्शनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन (अंबिका मंदिर चौक,तहसील कार्यालय,सांगोला) येथे येत्या ९ मार्चला राज्यस्तरीय वारकरी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

या राज्यस्तरीय वारकरी संमेलनानिमीत्त रविवारी ९ मार्च रोजी स.९.३० वा.ग्रंथ दिंडी (अंबिका मंदिर ते हॉल) स.१० वा.कार्यक्रमाचे उदघाटन होणार असून ह.भ.प.निरंजननाथ योगीजी महाराज (संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदी-प्रमुख विश्वस्त) हे प्रथम सत्राचे अध्यक्ष असतील तर,ह.भ.प.श्रीगुरु गोपाळ अण्णा वासाकर महाराज (वासाकर फड-पंढरपूर) हे प्रमुख अतिथी असतील.

             तसेच ह.भ.प.भागवत चवरे महाराज (राष्ट्रीय उपाध्यक्ष),ह.भ.प.अक्षय भोसले महाराज (प्रदेश अध्यक्ष अध्यात्मिक आघाडी शिवसेना) आचार्य तुषार भोसले (प्रदेश अध्यक्ष अध्यात्मिक आघाडी, भाजपा) आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख,आमदार समाधान  अवताडे,माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील, माजी आमदार शहाजीबापू पाटील,चेतनसिंह केदार सावंत (जिल्हाध्यक्ष भाजपा),राजा माने (संस्थापक अध्यक्ष-डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र),सांगोला तहसीलदार संतोष कणसे,सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी, सांगोल्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहतील.

        तसेच दु.२ वा.वारकरी मंडळ पदाधिकारी परिचय भेट.तर,दु.२.३० वा.महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व महिला पदाधिकारी यांचे मनोगत होऊन ४ वा.समारोप व पसायदानाने सांगता करण्यात येणार आहे.

               तरी,सर्व वारकरी भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन माजी नगरसेवक सतीशभाऊ सावंत व जोतिराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष) यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले.या कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर माऊली भगरे (जिल्हा अध्यक्ष),बिरा बंडगर महाराज (सह जिल्हा अध्यक्ष), अखिल भाविक वारकरी मंडळाचे सर्व पदाधिकारी हे परिश्रम घेत आहेत.या पत्रकार परिषदेसाठी बळीराम जांभळे (राष्ट्रीय सचिव),ज्ञानेश्वर माऊली भगरे (जिल्हाध्यक्ष-पंढरपूर विभाग), महादेव दिवसे हे उपस्थित होते.
          ——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button