महत्वाच्या बातम्या

सांगोल्यात गरीब व वृध्द विधवेची संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त अन्नदानासाठी आर्थिक मदत

 

सांगोला :

सांगोला शहरातील खडतरे गल्ली येथे धनदांडग्या समाजातील लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी एक घटना नुकतीच घडली असून श्री संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त एका वृध्द विधवा महिलेने शेतात खुरपायला जाऊन व कष्ट करुन कमावलेली रक्कम छोटीशी भेट म्हणून अन्नदानासाठी दिल्याचे पाहून उपस्थित सर्वांचेच अंत:करण ढवळून निघाले.

एकीकडे लाखो रुपयांची संपत्ती, जमीन,जुमला,गाडी व बंगले असणाऱ्या लोकांनी या संतांच्या जयंतीकडे पाठ फिरवली. परंतु समाजाचे आपण कांहीतरी देणे लागतो, याची जाणीव ठेवणार्‍या अशा कर्तृत्ववान, दातृत्ववान व सामाजिक जाण असणाऱ्या विचारांच्या लोकांची गरज असून प्रत्येक समाजात हे विचार रुजायला पाहिजेत. स्वतःला सुशिक्षित व सधन समजणारा हा समाज सध्या सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून दूर जाताना दिसत आहे.समाजाच्या पुढील पिढीसाठी हे विचार व या भावना अतिशय घातक असल्याचे मत यावेळी उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले.

यावेळी त्या वृध्द व विधवा महिलेचे जयंती उत्सव मंडळाच्या वतीने सदर सन्मान करण्यात आला. याप्रसंगी,माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे,उद्योगपती राजेश खडतरे, निवृत्त शिक्षक जयसिंग खडतरे, संगीता पाखरे मॅडम,लताबाई खडतरे,कमल राजगुरु,नितीन खडतरे,शंभू खडतरे,शैलेश स्वामी, खडतरे बंधू,इतर महिला व समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button