शैक्षणिक

“काव्यपुष्पांजली” या पुष्पलता मिसाळ यांच्या काव्यसंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार

 

सांगोला :

               सावित्रीबाई फुले विद्यापीठ,पुणे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन व समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य मांतग साहित्य परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री सौ.पुष्पलता मिसाळ यांच्या “काव्यपुष्पांजली” या काव्यसंग्रहास नुकताच “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वांङ्:मय पुरस्कार – २०२३” हा राज्यस्तरीय पुरस्कार अनेक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सावित्रीबाई फुले विद्यापीठ,पुणे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन व समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य मांतग साहित्य परिषद,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणार्‍या या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण संत ज्ञानेश्‍वर सभागृह,सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठ,पुणे येथील शाही हाॅलमध्ये दिमाखदार सोहळ्यात पद्श्री दादा इदाते यांचे हस्ते करण्यात आले.

सदर कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी मा.प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे हे होते. यावेळी,पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. कारभारी काळे,पद्श्री रमेश पतंगे,आमदार सुनील कांबळे, मातंग साहित्य परिषद,महाराष्ट्र,पुणेचे संस्थापक,अध्यक्ष डॉ.धनंजय भिसे, समरसता साहित्य परिषदेचे समन्वयक डॉ.अंबादास सगट, कार्यवाह डॉ.प्रसन्न पाटील व अध्यासन प्रमुख डॉ.सुनिल भडंगे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.सदर कार्यक्रमास अनेक जेष्ठ लेखक, कवी,साहित्यिक आणि रसिक श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button