राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी शंकरराव काळे

 

सांगोला :

नाभिक संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष भगवानराव बिडवे यांचे आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अभिजीत बंने व मल्लिनाथ चौधरी तसेच पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस व सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख सुहास गाडेकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी शंकरराव काळे यांची नुकतीच निवड करण्यात आली.

नूतन जिल्हाध्यक्ष शंकरराव काळे यांनी यावेळी बोलताना सांगीतले की, सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील नाभिक समाजाची एकजूट करुन नाभिक समाजाच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार, नाभिक समाजाच्या सोलापूर जिल्ह्यातील दुकानदारांना एकत्रित करुन दुकानदारांच्या अडचणी व समस्यांचे निवारण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहीन,अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

सांगोला येथील मिरज रोडवरील हॉटेल गोकुळ येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाच्या बैठकीत सोलापूर जिल्हाध्यक्षपदी शंकरराव काळे यांची निवड करण्यात आल्याचे नियुक्तीपत्र वरील मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन मनोज खंडागळे यांनी केले.या कार्यक्रमास सांगोला शहर व तालुक्यातील नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी गौरव काळे,संतोष जगताप,सोमनाथ गवळी, साहेबराव जाधव,समाधान सुरवसे,विनायक सागांवकर, संतोष जगताप,संतोष चव्हाण,दगडू काळे,केतन गवळी, अजय चव्हाण,युवराज काळे,नाना जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले.
———————————————————————