सामाजिक

एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेणार्‍या तावशीच्या धीरजला आपुलकीचा आर्थिक धीर

सांगोला :

                   घरची परिस्थिती हलाख्याची असतानाही एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेणार्‍या तावशी येथील धीरज विकास सातपुते या विद्यार्थ्यास सांगोला येथील आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने २५ हजार रुपयांची मदत देवून आर्थिक आधार देत आपुलकीकडून मानसिक धीरही देण्यात आला आहे.

पंढरपूर तालुक्यातील तावशी येथील रहिवासी व सध्या ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज,मुंबई येथे एम.बी.बी.एस.च्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या धीरज विकास सातपुते या विद्यार्थ्याची परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे त्यास ही आर्थिक मदत करण्यात आली आहे. आपुलकीच्या आवाहनाला प्रतिसाद देवून सदस्यांकडून जमा झालेल्या २५ हजार ११ रुपयाचा धनादेश धीरजचे वडील विकास सातपुते यांचेकडे नुकताच सुपूर्द करण्यात आला.

      यावेळी,आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर,रमेशअण्णा देशपांडे,महादेव दिवटे,इंजि.विकास देशपांडे, अमर कुलकर्णी, आण्णासाहेब मदने,अतुल वाघमोडे,अरविंद केदार, सुरेशकाका चौगुले,बंडू मारडे व अरविंद डोंबे आदी उपस्थित होते.
                               ————————————————

आपुलकीकडून आवाहन :

धीरजच्या घरची परिस्थिती नाजूक असूनही तो मोठ्या कष्टाने व जिद्दीने एम.बी.बी.एस.चे शिक्षण पूर्ण करत आहे.त्याला अजूनही आर्थिक मदतीची गरज असून दानशूर व्यक्तिंनी त्याच्या (७७५८८७२११३) या मोबाईल नंबरवर ‘फोन पे’ द्वारे मदत करावी, असे आवाहन आपुलकीकडून करण्यात येत आहे.
———————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button