महत्वाच्या बातम्या

स्व.आ.गणपतराव देशमुख यांच्या स्मृतीदिन व जयंती दिनानिमित्त सांगोल्यात विवीध कार्यक्रमांचे आयोजन

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आम.बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

 

सांगोला :

सांगोल्याचे भाग्यविधाते स्व.डॉ.गणपतराव देशमुख ऊर्फ आबासाहेब यांच्या ३० जुलै रोजीच्या स्मृती दिनानिमित्त तसेच १० ऑगस्ट रोजीच्या जयंती दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या तालुकास्तरीय विवीध कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी आम.डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत नुकतीच एक बैठक संपन्न झाली.

यावेळी आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी मार्गदर्शन करताना सांगीतले की,३० जुलै रोजी समाधी स्थळावर सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत कार्यक्रम होणार असून सकाळी १० वाजता ह.भ.प.महाराज यांचे किर्तन होणार आहे व १२ वाजता फुलांचा कार्यक्रम तसेच स्व.आबासाहेबांना अभिवादन करण्यात येईल.दुपारी १२ नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. पुढे ते म्हणाले की,३० जुलै ते १० आॕगस्ट दरम्यान,गावोगावी कार्यक्रम घेत असताना रक्तदान शिबीरे,वृक्षारोपण,खाऊ वाटप,शालेय साहित्याचे वाटप करण्याबरोबरच सध्या स्वच्छता मोहिम गरजेची असून सर्वांनी एकत्रीत येऊन आपले गाव स्वच्छ करावे. तसेच स्व.आबासाहेबांचे विचार व कार्य येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरावे,यासाठी बहुतांश गावांमध्ये व्याख्यान अथवा निबंध स्पर्धा आयोजित कराव्यात.तसेच प्रत्येक कार्यकर्त्यांनी गावोगावी स्व.आबासाहेबांचा स्मृतीदिन व जयंती ही नियोजनबद्ध करण्याचे आवाहन आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी केले.

सदर बैठकीमध्ये गावोगावच्या कार्यकर्त्यांनी ३० जुलै ते १० आॕगस्ट दरम्यानचे आपापल्या गावातील कार्यक्रमांचे नियोजन सांगीतले.बहुतांश गावांमध्ये रक्तदान शिबिरे, सर्वरोग निदान शिबीरे,डोळे तपासणी शिबिरे तसेच वृक्षारोपण,खाऊ वाटप व शालेय विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटपाचे नियोजन करणार असल्याचे सांगीतले. तर,काही गावांमध्ये विविध दाखले मोफत देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.सांगोला शहरातील कार्यकर्त्यांकडून वृक्ष लागवड,खाऊ वाटप, शैक्षणिक साहित्यांचे वाटप तसेच राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

सदर बैठकीस शेकापचे चिटणीस दादासाहेब बाबर,शहर चिटणीस विजय राऊत यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाच्या विविध संस्थांचे चेअरमन,व्हा.चेअरमन व पदाधिकारी तसेच आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, आजी माजी पंचायत समिती सदस्य,आजी माजी सरपंच व उपसरपंच तसेच पुरोगामी युवक संघटनेचे पदाधिकारी, शेकापचे व पुरोगामी युवक संघटनेचे कार्यकर्ते या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
===================================

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button