सांगोला :
सामाजिक बांधिलकी जपत आपुलकी प्रतिष्ठान व विविध देणगीदारांच्या सहकार्याने सांगोला शहर व तालुक्यातील
एकूण ३९० गरजू विद्यार्थ्यांसाठी सुमारे ९० हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य व सायकल वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमातून सांगोला शहर व तालुक्यातील ३९० विद्यार्थ्यांना सुमारे ३१ हजार रुपये किमतीचे विविध शालेय साहित्य वितरित करण्यात आले.तसेच शिक्षणासाठी दूरवरुन पायी प्रवास करणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींची गैरसोय दूर करण्यासाठी सायकलींचेही वाटप करण्यात आले.यामध्ये विविध भागांतून जमा झालेल्या १८ जुन्या सायकलींची दुरुस्ती करुन त्या विद्यार्थ्यांना देण्यात आल्या.या सायकलींच्या दुरुस्तीसाठी सुमारे २२ हजार ५०० रुपये खर्च करण्यात आला. याशिवाय,३६ हजार रुपये किमतीच्या ११ नवीन सायकलीही गरजू विद्यार्थ्यांना भेट देण्यात आल्या. अशाप्रकारे शैक्षणिक साहित्य, जुन्या सायकलींची दुरुस्ती आणि नवीन सायकलींचे वाटप यावर एकूण सुमारे ९० हजार रुपये खर्च करण्यात आला.
या उपक्रमासाठी काकासाहेब चन्ने,राकेश ढाणके, बापूसाहेब ठोकळे,राजकुमार बनसोडे,स्वरुप अरबळी,दादा खडतरे व विलास नलवडे गुरुजी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.तसेच अण्णासाहेब इंगवले यांनी वाढदिवसानिमित्त २ सायकली,महादेव दिघे (वाढेगाव) यांनी २ सायकली, सिद्धी मोटर्सचे दीपक शिंदे यांनी १ सायकल तर,एका अनामिक देणगीदाराने १ सायकल देणगी स्वरुपात दिली. याशिवाय अनेक दानशूर व्यक्तींनी आपल्याकडील जुनी सायकल व आर्थिक मदतीचा हातभार लावला.
हा उपक्रम सांगोला शहरासह जि.प.प्रा.शाळा बंडगरवाडी (शिरभावी),जि.प.प्रा.शाळा बागलवाडी,जि.प.प्रा.शाळा सांगोलकर वस्ती (तरंगेवाडी), जि.प.प्रा.शाळा शेळकेवस्ती (शिवणे),निजामपूर हायस्कूल, निजामपूर आणि जि.प.प्रा. शाळा,खांडेकर वस्ती (नवी, महूद) येथील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आला. तसेच डोंगरगाव परिसरातील वाड्या-वस्त्यांवर जाऊन एकल महिलांचा सर्वेक्षण उपक्रम राबविताना त्यांच्या शिक्षण घेणाऱ्या मुलांसह गावातील इतर गरजू विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्य घरपोच देण्यात आले.गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर करुन त्यांची शैक्षणिक वाटचाल अधिक सुकर व्हावी, या उद्देशाने आपुलकी प्रतिष्ठानने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
===================================
More Stories
मुख्यमंत्री सहायता कक्ष व कै.आमदार काकासाहेब साळुंखे- पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित चरणसेवा व आरोग्यसेवा शिबिरास वारकऱ्यांचा रेकॉर्डब्रेक प्रतिसाद
आपुलकी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याला देणगीदारांचा मोठा हातभार
भीमनगर प्राथ.शाळेत छ.शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी