पहिल्याच दिवशी हजारो भाविकांची चरणसेवा व आरोग्यसेवा
सांगोला :
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री सहायता कक्ष तसेच कार्यतपस्वी आमदार स्वर्गीय काकासाहेब साळुंखे-पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नक्षत्र मंगल कार्यालय (मेथवडे फाटा) येथे आयोजित करण्यात आलेल्या वारकरी चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिरास बुधवारी वारकऱ्यांनी रेकॉर्डब्रेक प्रतिसाद दिला.
या शिबिराचे उदघाटन डॉ.प्रदीपदादा साळुंखे-पाटील व त्यांचे व्याही विजयराव देशमुख यांनी केले.यावेळी भाजप नेते बाळासाहेब एरंडे,तानाजीकाका पाटील यांचेसह नगरसेविका तनुजा एरंडे,डॉ.सचिन गवळी,डॉ.राज मिसाळ, अभिजित नलवडे,अमोल नलवडे,वारकरी बांधव आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.पहिल्याच दिवशी या शिबिरात हजारो भाविकांची आरोग्यसेवा व चरणसेवा करण्यात आली.

या शिबिरात माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी शिबीरस्थळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.तर,राज्याचे लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाही जयंती निमित्त अभिवादन केले.त्याचबरोबर,पंढरीला पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांचे पायाला दीपकआबांनी आयुर्वेदिक तेल लावून स्वतः मालिश करुन चरणसेवा केली. वारकऱ्यांच्या पायाला आयुर्वेदिक तेल लावून पायांची मालिश करणे तसेच त्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना आवश्यक औषध उपलब्ध करुन देणे तसेच भुकेल्या भाविक भक्तांना जेवण आणि ज्यांना थांबायला वेळ नाही, अशा वारकऱ्यांना अल्पोपहार देण्यात आला. त्याचबरोबर पडत्या पावसात नक्षत्र मंगल कार्यालयात सर्व वारकऱ्यांना मुक्कामाची आणि विश्रांतीची सर्व सोय करण्यात आली होती.
ग्यानबा तुकारामच्या गजरात लाखो भाविक दरवर्षी कर्नाटक तसेच शेजारील राज्यातून देशाचे आध्यात्मिक विद्यापीठ अर्थात पंढरीच्या पांडुरंगाचे आषाढी वारी निमित्त दर्शन घेण्यासाठी जात असतात.वाटेत निघालेल्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी बुधवारी २२ व गुरुवारी २३ जुलै असे दोन दिवस नक्षत्र मंगल कार्यालय (मेथवडे फाटा, ता.सांगोला) येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिराच्या पहिल्या दिवशी काकासाहेब साळुंखे- पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ.पियुषदादा साळुंखे-पाटील यांच्यासह सह्याद्री फार्मसी कॉलेज,मेथवडे आणि फॅबटेक फार्मसी कॉलेज,सांगोला येथील विद्यार्थी तसेच शिक्षकांनीही वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा दिली.
=========================
दीपकआबांनी जपला आध्यात्मिक वारसा :
माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या मातोश्री ह.भ.प.शारदादेवी साळुंखे-पाटील आणि वडील स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील हे दोघेही वारकरी होते.दरवर्षी शारदादेवी साळुंखे-पाटील या न चुकता पंढरीची वारी पूर्ण करायच्या त्यांच्या पश्चातही त्यांच्या नावाने आळंदी ते पंढरपूर सुमारे ३०० ते ५०० वारकऱ्यांची दिंडी दरवर्षी पंढरपूरला जाते.माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनीही आपला आध्यात्मिक वारसा जपत बुधवारी अनेक वारकऱ्यांच्या पायाला आयुर्वेदिक तेल लावून मालिश केली व वारकऱ्यांची चरणसेवा केली. =========================
वारकऱ्यांनी मानले देवाभाऊंचे आभार :
दरवर्षी आषाढी वारीला ऊन,वारा आणि पावसाची तमा न करता लाखो भाविक पंढरीच्या दिशेने प्रवास करत असतात. वारकऱ्यांची कुठेही गैरसोय होऊ नये म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांनी ठिकठिकाणी चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिर आयोजित करुन वारकऱ्यांची सेवा केली आहे. देवाच्या वाटेवर भक्ताला कुठेही त्रास होऊ दिला नाही, त्याबद्दल हजारो वारकऱ्यांनी महाराष्ट्राच्या लाडक्या देवाभाऊंचे आभार मानले.
==========================
More Stories
आपुलकी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याला देणगीदारांचा मोठा हातभार
भीमनगर प्राथ.शाळेत छ.शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
स्व.छबूताई गायकवाड यांच्या रक्षा विसर्जनादिवशी वृक्षारोपण करुन अस्थिचे विसर्जन