महत्वाच्या बातम्या

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सांगोला शहरातील ५५ घरकुलांच्या प्रस्तावास केंद्र शासनाची मंजुरी – आमदार शहाजीबापू पाटील

 

सांगोला :

देशातील प्रत्येक कुटुंबाला २०२४ पर्यंत पक्के घर असायला हवे या हेतूने शहरातील गरिबांसाठी “प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)” या योजनेची सुरुवात सन २०१८ साली करण्यात आली होती.या योजने अंतर्गत आत्तापर्यंत ४ टप्प्यात सांगोला नगरपालिका हद्दीतील एकूण २५१ कुटुंबांना घरकूल मंजुर करण्यात आले होते. त्यापैकी आजअखेर १९५ घरकूल पूर्ण झाले असून उर्वरित घरे अंतिम टप्प्यात आली आहेत. आता,पाचव्या टप्प्यात केंद्र शासनाने  नव्याने ५५ कुटुंबांना मंजूरी प्रदान केली आहे. या घरकुल मंजुरीसाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून घरकुले मंजूर करून घेतली आहेत.

या योजनेत पात्र लाभार्थ्यास स्वतःचे घर बांधण्यासाठी राज्य शासनाचे १ लाख व केंद्र शासनाचे १.५ लाख असे एकूण २.५ लाख रुपये इतके अनुदान वितरित करण्याची तरतूद असुन लाभार्थीने स्वत:च्या मालकीच्या जागेत घरकुलाचे बांधकाम करून नगरपरिषदेकडून अनुदान घ्यायचे आहे. या योजनेची सांगोले नगपरिषदेमार्फत प्रभावी अंमलबजावणी सुरु असून लाभार्थ्यांची यादी नगरपालिका कार्यालय येथे लावण्यात आलेली आहे.पात्र लाभार्थ्यांनी पुढील कार्यवाही करण्यासाठी सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी डाॅ.सुधीर गवळी यांच्याशी संपर्क साधून पुढील कार्यवाही करून घ्यावी,असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले आहे.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button