महत्वाच्या बातम्या

१ कोटी रुपये खर्चून सांगोल्यात राष्ट्रसंत गाडगेबाबांचे भव्य दिव्य समाजमंदीर उभे करु – आमदार शहाजीबापू पाटील

 

सांगोला :

    गाडगेबाबांनी आपले संपूर्ण आयुष्य उपेक्षित,वंचित, गोरगरिबांसाठी खर्ची घातले,त्यांनी माणसात देव पाहिला,गांवोगांवी जाऊन स्वच्छता केली. तसेच, किर्तनाच्या माध्यमातून समाजातील अंधश्रध्दा,अनिष्ट रुढी व परंपरा दूर करण्यासाठी मोठे कार्य केले असून राष्ट्रसंत गाडगेबाबांचे विचार आजही समाजाला मार्गदर्शक आहेत.सांगोला शहरात गाडगेबाबांचे समाजमंदीर उभे करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ३५ लाख रुपयांचा निधी आजमितीला मंजूर केला असून जागेची व्यवस्था होताच सुमारे १ कोटी रुपये खर्चून सांगोल्यात राष्ट्रसंत गाडगेबाबांचे भव्य दिव्य असे समाजमंदीर उभे करु,अशी ग्वाही आम.शहाजीबापू पाटील यांनी दिली.

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या १४७ व्या जयंतीनिमित्त सांगोला शहरातील परीट गल्ली येथे आयोजित कार्यक्रमात आमदार शहाजीबापू पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी माजी नगराध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, शेकापचे युवानेते डॉ.बाबासाहेब देशमुख,भाजपाचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार,खरेदी-विक्री संघाचे नूतन चेअरमन इंजि.रमेश जाधव,डॉ.पियुषदादा साळुंखे-पाटील,माजी नगराध्यक्ष अनिलभाऊ खडतरे,रिपाईंचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते, माजी नगरसेवक सुरज बनसोडे व संजय देशमुख सर, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे,युवासेना नेते गुंडा दादा खटकाळे,अँड.गजानन भाकरे,उद्योगपती सुरेश फुले, पत्रकार हमीदभाई इनामदार,सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब भाकरे,दुय्यम निबंधक श्री.चव्हाण,अच्युत फुले,
समाधान सावंत,प्रताप इंगोले,वसंत सुपेकर,हरिभाऊ जगताप,शिवाजी जावीर,प्रकाश भोसले,सिद्धेश्वर झाडबुके, विलास म्हेत्रे,शंभु माने आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी गाडगेबाबा यांच्या जीवन चरित्रावर बंडगर महाराज यांचे कीर्तन पार पडले व नंतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष दादा जाधव यांनी केले तर,सूत्रसंचालन व आभार राजेंद्र यादव यांनी मानले.याप्रसंगी,शहर व तालुक्यातील नागरिक, महिला भगिनी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीट समाज सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button