महत्वाच्या बातम्या

स्व.संतोष देशमुख यांच्या अमानवी हत्येमागील सर्व दोषींना कडक शिक्षा व्हावी – आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख

मस्साजोगचे स्व.संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची डाॅ.बाबासाहेबांनी घेतली भेट

सांगोला :

मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी,आम्ही सर्वजण प्रयत्न करत असून त्यांना न्याय मिळेपर्यंत,या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहू,अशा शब्दांत देशमुख कुटुंबियांना आश्वस्त करुन आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी आणि स्व.संतोष देशमुख यांच्या अमानवी हत्येमागील सर्व दोषींना कडक शिक्षा व्हावी,अशी मागणी सांगोल्याचे आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

                            सांगोला विधानसभा मतदार संघाचे आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे जावून स्व.संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या.तसेच स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करत आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करुन या अमानवी हत्येमागील सर्व दोषींना कडक शिक्षा होण्यासाठी प्रयत्नशील राहू,अशी ग्वाही आम.डाॅ. बाबासाहेब देशमुख यांनी स्व.संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना दिली.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button