सांगोला नगरपरिषदेत ‘आंतरराष्ट्रीय एकल महिला दिन’ उत्साहात साजरा

विविध शासकीय योजनांची दिली माहिती 

सांगोला :

समाज,कुटुंब व प्रशासकीय पातळीवर एकल महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधणे,त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे,त्यांना स्वावलंबी बनवून समाजात सन्मानाची वागणूक मिळवून देणे हा उद्देश नजरेसमोर ठेऊन विधवा, घटस्फोटीत,अविवाहित किंवा पतीपासून विभक्त झालेल्या महिलांसाठी दरवर्षी २३ जून रोजी जगभरात साजरा केला जाणारा ‘आंतरराष्ट्रीय एकल महिला दिन’ हा दिन सांगोला नगरपरिषदेच्या वतीने अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनाच्या कार्यक्रमाचे उदघाटन नगरपरिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती छायाताई मेटकरी यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी आपल्या प्रास्ताविकात आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. यासमयी,नगरसेविका राणीताई माने यांनी एकल महिलांच्या पाठीशी नगरपालिका खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.तर,महिला व बाल कल्याण सभापती छायाताई मेटकरी यांनी,एकल महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांना समाजात समानतेचा अधिकार मिळवून देण्यासाठी सांगोला नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे सांगितले.

तसेच कार्यालयीन अधीक्षक सचिन पाडे यांनी,यावर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीचे निमित्त साधून महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी,कर निरीक्षक प्रियांका पाटील यांनी एकल महिलांकरिता असलेल्या विविध आर्थिक व सामाजिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली.याप्रसंगी,उपस्थित अनेक एकल महिलांनी आपल्याला भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर आपले मत मांडले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरद थोरात,जयश्री खडतरे,सविता लोखंडे,कोमल चांडोले,सारिका लोखंडे आणि प्रतिभा कोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे यांनी केले तर,कर निरीक्षक अस्मिता निकम यांनी आभार मानले.सदर कार्यक्रमाला सांगोला नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमास सांगोला शहरातील एकल महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.
                    ==========================

प्रमुख उपस्थिती :

याप्रसंगी,महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती छायाताई मेटकरी आरोग्य सभापती गोदाताई बनसोडे, नगरसेविका राणीताई माने,आशादेवी यावलकर,श्रद्धा साबळे,अनिता केदार, सुजाता केदार,वैशाली झपके,शोभा फुले,सीमा सरगर,तनुजा एरंडे या सर्व नगरसेविका तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांचेसह प्रमुख अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
==========================

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia