तालुक्यातील शेतकर्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
सांगोला :
सांगोला नगरपरिषदेमार्फत शहरातील कचरा डेपोमध्ये तयार करण्यात येणारे कंपोस्ट खत हे शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असून विशेषत: ऊस या पिकासाठी अतिशय फायदेशीर ठरत असल्याने सांगोला तालुक्यातील शेतकर्यांना हे खत मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून ज्या शेतकर्यांना हे खत हवे असेल त्यांनी कार्यालयीन वेळेत दिवसभर स्वत:चे वाहन आणून त्यांना हवे तेवढे कंपोस्ट खत घेवून जाणे,असे आवाहन नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने व मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी केले आहे.
सांगोला शहरातून जमा झालेला ओला व सुका कचरा हा शहरातील घनकचरा व्यवस्थापन केंद्र (कचरा डेपो) येथे आणून त्यावर प्रक्रिया करुन त्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाते.हे कंपोस्ट खत शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असून विशेषत: ऊस या पिकासाठी अतिशय फायदेशीर ठरत असल्याने तालुक्यातील शेतकर्यांना हे खत मोफत देण्याचा निर्णय नगरपरिषदे मार्फत घेण्यात आला आहे.
हे खत मोफत मिळण्यासाठी शेतकरी हा सांगोला तालुक्यातील असणे गरजेचे असून त्यांनी सोबत 7/12 उतारा व आधार कार्ड घेवून येणे बंधनकारक आहे.तरी, तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना हे खत हवे आहे त्यांनी घनकचरा व्यवस्थापन केंद्र (कचरा डेपो) येथून घेवून जावा,असे आवाहन नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने व मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांचेकडून करण्यात आले आहे.
===================================
More Stories
घरपट्टीत कसलीही दरवाढ नाही,ही तर वाढीव बांधकामामुळे करवाढ – नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने
दुष्काळी सांगोला तालुक्याला पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी त्वरित सोडावे – माजी आमदार दीपकआबा
स्व.आ.गणपतराव देशमुख यांच्या स्मृतीदिन व जयंती दिनानिमित्त सांगोल्यात विवीध कार्यक्रमांचे आयोजन