महत्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी सांगोल्यात

आ.शहाजीबापूंच्या प्रचारार्थ सांगोल्यात मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा

 

सांगोला :

सांगोला विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ  शुक्रवारी दुपारी २ वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर विजयी संकल्प सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आ.शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

 राज्यात शिवसेना (शिंदे गट),भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा गट),रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,रयत क्रांती संघटना या पक्षांची महायुती असून सांगोला विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दि.१५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता सांगोला शहरातील वासूद रोडवरील न्यू इंग्लिश स्कूल शेजारील पटांगणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर विजयी संकल्प सभा आयोजित करण्यात आली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या जाहीर सभेद्वारे सांगोला विधानसभा मतदार संघातील मतदारांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी,या सभेसाठी सांगोला शहर व तालुक्यातील तसेच भाळवणी गटातील महायुतीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व मतदार बंधू-भगिनीनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button