महत्वाच्या बातम्या

सांगोला नगरपरिषदेचे पाणीपुरवठा अभियंता तुकाराम माने सेवानिवृत्त

 

सांगोला :

         शांत,संयमी व अत्यंत सेवाभावी वृत्तीने खरीखुरी सेवा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिकपणे काम करणारे,सांगोला नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष पाणीपुरवठा अभियंता म्हणून नावलौकिक असणारे इंजि. तुकाराम माने हे ३१ मे रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.

पुढील २५ वर्षाच्या काळात सांगोला शहराला कधीही पाणीपुरवठा कमी पडणार नाही,अशा पध्दतीने नियोजन करुन ३५ कोटी रुपयांची नवीन योजना त्यांच्या कार्यकाळात त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कार्यरत झाली असून शहराच्या शेवटच्या वाडी-वस्तीवरही पंढरपूरहून पाईपलाईनद्वारे आणलेले चंद्रभागेचे पाणी पोहोचवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

इंजि.तुकाराम माने हे जरी आज सेवानिवृत्त होत असले तरी,भविष्य काळात शहराला येवू शकणार्‍या पाणीपुरवठ्याच्या अडचणीवेळी नक्कीच ते मार्गदर्शन करतील,अशी अपेक्षा सेवानिवृत्तीनिमीत्त सत्कार करताना माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे यांनी व्यक्त केली.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button