* भारतीय शेअर मार्केटमध्ये ऐतिहासिक घडामोड
* चालू आठवड्यात लाईफ टाईम तेजी
* बँक निफ्टीने नवा उच्चांक गाठला
– दिपक ऐवळे – बिजनेस असोसिएट,सांगोला
काल भारतीय शेअर मार्केटमध्ये निफ्टी बँकने नवीन हाय निर्माण केला असून हा लाईफ टाईम हाय आहे. तर, भारतीय शेअर बाजारात सिमेंट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तेजी निर्माण झाल्याने श्री सिमेंट, जे.के. सिमेंट, इंडिया सिमेंट, स्टार सिमेंट यामध्ये ६ टक्के पर्यंत वाढ झाली आहे.तसेच मेटल क्षेत्रातही चांगल्या प्रकारे तेजी निर्माण झाली असून चालू आठवड्यात भारतीय शेअर मार्केटमध्ये नवीन उच्चांक निर्माण होत असून भारतीय शेअर मार्केट सर्वसामान्यांसाठी फायदेशीर आहे.
भारतीय शेअर मार्केट मधून नफा मिळवण्यासाठी आपणा सर्वांना फ्री मध्ये डिमॅट अकाउंट काढून घ्यावा लागेल. (त्यासाठी, 90 21 53 70 95 या नंबरवर संपर्क करा) आज आपण या लेखात – गुंतवणूक किती करावी ? व ती कोणत्या पातळीवर काढावी ? व गुंतवणुकीसाठी कोणते मार्ग अवलंबावेत ? हे आपण या लेखातून पाहणार आहोत.भारतीय शेअर बाजारात प्रवेश करण्यासाठी किती गुंतवणुकीची गरज आहे ? किती पैसे ट्रेडिंग साठी लावले पाहिजेत ? तसेच आलेला नफा कधी काढावा ? ही अत्यंत उपयुक्त माहिती असून आजच्या घडीला अशी कोणीही माहिती देत नाही.पण दिपक शेअर मार्केट बिजनेस असोसिएट यांनी हे ज्ञान मोफत देण्याचे ठरवले आहे.

: गुंतवणूक :
गुंतवणूक ही अशी गोष्ट आहे की,गुंतवणुकीत जेवढे पैसे लावाल तेवढे कमी आहेत.तरी, गुंतवणूकदार हे पारंपारिक गुंतवणुकीच्या साधनावरच मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. अनेकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यात रिस्क वाटते, त्यामुळे गुंतवणूकदार भारतीय शेअर मार्केटमध्ये कमी आणि ट्रेडिंगमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. तर माझे मत आहे की,इन्व्हेस्टिंग मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली पाहिजे व ट्रेडिंगमध्ये आपल्या क्षमतेनुसार गुंतवणूक करावी.
“आपल्या वयाला शंभर मधून वजा करून जी संख्या येते,तेवढा पैसा गुंतवणूक करावा. म्हणजेच, इक्विटीमध्ये लावावा आणि वयाप्रमाणे जी संख्या येते ती डेट मध्ये,संदेश म्युच्युअल फंड यामध्ये गुंतवणूक करावी.”
भारतीय अर्थव्यवस्था विकसित होत असून अशा वेळेस आपण सर्वांनी अँग्रेसिव्ह पैशाची गुंतवणूक करून छप्पर फाडके रिटर्न मिळवावा.ज्यांना चार्ट बघून गुंतवणूक जमते त्यांनी मध्यम,दीर्घ गुंतवणूक करावी. ज्यांना शेअर मार्केट बद्दल कांहीच कळत नाही,त्यांच्यासाठी विकल्प म्हणजे प्रॉपर्टी साठी गुंतवणूक करणे. सोने खरेदी करायची म्हंटले तर, आजच्या घडीला सोन्याचा दर ६० हजाराच्या आसपास आहे तर, यापेक्षा शेअर बाजारात छोट्या गुंतवणुकीने सुरुवात करून तेही आक्रमक पद्धतीने गुंतवणूक केली तर,चांगल्या प्रकारे रिटर्न मिळतो. उदाहरणच सांगायचे झाले तर, जून २०२२ मध्ये १६,००० असणारा निफ्टी आज १८,८०० च्या आसपास आहे.दोन हजार पट वाढ एका वर्षात झालेली आपणाला पाहावयास मिळत आहे.
: ट्रेडिंग :
गुंतवणूकदार नेहमी ट्रेडिंगमध्ये हात सोडून गुंतवणूक करतात पण, दोन-तीन वर्ष थांबावे लागते,यासाठी ते थोडीशी कमी गुंतवणूक करतात.परंतु, ट्रेडिंग हा व्यवसाय आहे,यामध्ये आपल्याला रिस्क किती घेता येते ? ते पाहून आपण इन्व्हेस्टमेंट करावी. *प्रीमियमचा निफ्टी* सध्याचा निफ्टीचा प्रीमियम ९ लाख रुपये आहे तर,त्यासाठी स्ट्रॅटेजी तयार करावी लागते.त्यासाठी आपणाला एक प्रकारचा धोका पत्करून काम करावे लागते.त्यामध्ये जेवढा जास्त धोका पत्कराल, तेवढा जास्त फायदा मिळेल.ट्रेडिंगचा गोल्डन रुल हा आहे की, पैसे हे परफॉर्मन्सच्या आधारावर लावावेत. आपला स्वतःचा परफॉर्मन्स तपासावा, थोडी थोडी गुंतवणूक करत आपण आपले कॅपिटल परत वाढवत जावे. सुरुवातीला एक हजार रुपयाची रिस्क घेऊन भांडवल वाढवत जाताना आपली रिस्क कमी करत जावी.इतरांचे स्क्रीन शॉट बघून आपण प्रभावित न होता,स्वतःचा परफॉर्मन्स तपासावा. जॉबमध्ये जेवढे पैसे मिळतात,तेवढे मिळवण्यासाठी सुरुवात करा.(या सर्व प्रशिक्षणासाठी 90 21 53 70 95 या नंबरवर संपर्क करा) कर्ज घेऊन ट्रेडिंग करू नका,स्वतःच्या कॅपिटलनेसवरच ट्रेड करावा.
: गुंतवणूक केलेले पैसे कधी काढावेत :
पैसे वाढलेले बघून मनाला समाधान होते,पैसे वाढलेले दिसतात पण,अनेक वेळा आपत्ती येतात.यावेळेस मार्केट जैसे थे होते. उदाहरणच सांगायचे झाले तर, कोविड महामारी,नोटाबंदी,महामंदी विविध प्रकारचे घोटाळे व विविध कारणाने शेअर मार्केटमध्ये ग्लोबल मार्केटचा असर,यामुळे परत मार्केट जैसे थे व दिसलेला जो नफा असतो तो आपण वेळेत नाही काढला तर,परत आपणाला तोच पैसा तिथेच दिसतो. त्यामुळे वेळोवेळी नेहमी पैसे हे गरजेनुसार काढले पाहिजेत,वरून खाली आणले पाहिजेत. प्रोफेशन करत असताना,आपल्याला जीवनात जगताना जे पैसे लागतात,ते पैसे यातूनच आपण वापरले पाहिजेत. त्यासाठी पैसे वेळोवेळी बाहेर काढले पाहिजेत.पूर्ण गुंतवणूक करताना पैसे नियमित गुंतवणूक केली पाहिजे तर, ट्रेडिंग करताना वेळच्या वेळेला पैसे काढून वैयक्तिक कुटुंबाच्या गरजा भागवल्या पाहिजेत.तर महिन्याला फिक्स अमाऊंट ही विड्रॉल केली पाहिजे,असे झाले तर आपणाला नेहमीच वेतन मिळत राहते.त्यासाठी महिन्याला फिक्स अमाऊंट आपण फिक्स केली पाहिजे.
: म्युच्युअल फंड :
ज्यांना भारतीय शेअर मार्केट मधील ज्ञान किंवा अभ्यास कमी आहे,त्यांनी चांगल्या प्रकारचे म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो,हा ऐतिहासिक रेकॉर्ड आहे तरी,प्रचंड संपत्ती निर्माण करण्याकरिता आपण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी.म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी आमच्याशी सतत संपर्कात रहा.
* महान राज्यकर्त्या महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या सर्वांना कोटी-कोटी हार्दिक शुभेच्छा !!
– दिपक ऐवळे (बिजनेस असोसिएट,सांगोला)
—————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने