प्रा.घाटुळे अमृत महोत्सवी वाढदिनी गौरव ग्रंथाचे प्रकाशन
सांगोला :
शिक्षण,समाजकारण,भ्रष्टाचार निर्मुलन,पाणीप्रश्न,अन्याय निवारण, न्यायालयीन लढा अशा एक ना अनेक बाबतीत केलेले कार्य प्रशंसनिय असून प्रा.उत्तमराव घाटुळे हे एक दीपस्तंभ आहेत,असे गौरवोदगार राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.प्रकाश वडगांवकर यांनी काढले.
सांगोला येथील सदानंद मल्टीपर्पज हॉलमध्ये आयोजित केलेल्या प्रा.घाटुळे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिनाच्या निमीत्ताने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.याप्रसंगी, व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.बाबासाहेब बंडगर तसेच सां.ता.उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबूराव गायकवाड,सां.ता.शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,ग्रामीण साहित्यिक डॉ.कृष्णा इंगोले, सौ.निर्मला घाटुळे हे उपस्थित होते.
यावेळी घाटुळे सरांच्या कार्यावर आधारित व भाऊसाहेब पवार संपादित “उत्तम ते सर्वोत्तम” या गौरव ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.यावेळी बोलताना डॉ.बंडगर म्हणाले की, एका शेतकर्याचा मुलगा शिक्षणाच्या माध्यमातून मातीशी नाळ असणारा वनस्पती शास्त्र हा विषय घेवून एक “उत्तम शिक्षक सर्वोत्तम” कसा होवू शकतो ? हे प्रा.घाटुळे यांनी दाखवून दिले. यावेळी, बाबूराव गायकवाड व प्रा.पी.सी.झपके यांनी घाटुळे सरांच्या सामजिक व शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकून त्यांचा गौरव केला.
कार्यक्रमाची सुरुवात घाटुळे सरांची ग्रंथतुला,धान्यतुला व औक्षण करुन करण्यात आली व मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. उपस्थितांपैकी प्रा.राजेंद्र ठोंबरे, प्रा.हेमंत आदलिंगे यांनी माजी विद्यार्थी या नात्याने मनोगत व्यक्त केले.स्वाती घाटूळे-चौगुले,सुवर्णा इंगोले यानी सरांच्या आठवणी सांगून शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात घाटुळे सरांचे विद्यार्थी प्रा.राजेंद्र ठोंबरे यांचा जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल व भाऊसाहेब पवार यांचा गौरव ग्रंथाचे मुख्य संपादक म्हणून सत्कार करण्यात आला.प्रा.उत्तमराव घाटुळे यांना सत्काराला उत्तर देताना गहिवरुन आले. डॉ.कृष्णा इंगोले यांनी प्रास्ताविक व भीमाशंकर पैलवान यांनी आभार प्रदर्शन केले.तर,जयंत गोरे यांनी सूत्रसंचालन केले.यासमयी,सांगोला शहर व परिसरातील सरांचे विद्यार्थी, मित्रमंडळी,ज्येष्ठ नागरिक,चैतन्य हास्य क्लबचे सदस्य, सांगोला विद्यामंदिर परिवारातील सेवानिवृत्त शिक्षक व आप्तेष्ट मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.याप्रसंगी,सांगोला विद्यामंदिर रिटायर्ड ग्रुपने कृतज्ञता पत्र देवून ऋण व्यक्त केले.
—————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
आपुलकी प्रतिष्ठानचा गुंफण सामाजिक पुरस्काराने गौरव