माजी आमदार दीपकआबा यांच्या पाठपुराव्याला यश
सांगोला :
सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना गेल्या १० ते १२ वर्षापासून त्यांच्या भूसंपादित जमिनीचे मोबदले न मिळाल्याने त्यांना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता.मात्र,अखेर माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून,बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी सक्षम अधिकारी नसल्याने ही मोबदला मिळण्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री नाम.चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडून अतिशय संवेदनशील असलेल्या या विषयाचे महत्त्व अत्यंत गांभीर्याने घेऊन,बैठकीस उपस्थित सचिवांना यासंदर्भात ठोस निर्णय घेण्याच्या उद्देशाने तात्काळ सक्षम अधिकाऱ्यांच्या नेमणुका करुन,वेळेत सुनावण्या घेऊन शेतकऱ्यांना कालमर्यादा देऊन निर्धारित वेळेत त्यांचा मोबदला देण्यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आल्याने अखेर राष्ट्रीय महामार्गातील बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे.
मुंबई येथे मंत्रालयातील दालनामध्ये नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून या बैठकीला महसूल विभागाचे मुख्य सचिव विकास खर्गे,सहाय्यक सचिव मिलिंद म्हैसकर, ॲड.रितेश कुलकर्णी यांचेसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर या बैठकीस सोलापूरचे जिल्हाधिकारी व पुणे विभागीय आयुक्त हेही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.
या निर्णयामुळे सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील साधारणत: १२ ते १५ हजार लाभार्थी शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे व बाधित शेतकऱ्यांची वर्षानुवर्षाची प्रतीक्षा संपणार आहे.या महामार्गामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी यांचे भूसंपादन होऊन,रस्ते पूर्ण होऊन त्यावरील वाहतूक सुद्धा अनेक वर्षापासून सुरु झाली.मात्र,या शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासाठी अधिकारी स्तरावरुन होणाऱ्या प्रक्रिया सक्षम अधिकारी नसल्यामुळे शेतकऱ्यांची अक्षरशः ससेहोलपट झाली.या खटल्यांमध्ये मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा होण्यासाठी वेळोवेळी तात्काळ सुनावणी होणे गरजेचे होते.परंतु, पुणे-सोलापूर व परत पुणे असा खटला सातत्याने चालत गेल्याने शेतकऱ्यांची जणू पूर्णपणे चेष्टाच केली जात होती.
सोलापूर जिल्ह्यातील १० ते १२ वर्षापासून १५ ते १६ हजार खटले आजपर्यंत प्रलंबित आहेत.त्यामुळे, मंत्रीमहोदयांनी माजी आमदार दीपकआबा यांच्या विनंतीवरुन वरीलप्रमाणे आदेश दिल्याने शेतकऱ्यांचा मोबदला मिळण्यासाठी अनेक वर्षापासून केलेल्या प्रतीक्षेला कायमस्वरुपी पूर्णविराम मिळून अडकलेले मोबदले मिळण्याचा मार्ग आता सुकर झाल्याने अन्याय सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळणार आहे.या निर्णयामुळे माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांचे बाधित शेतकरी वर्गातून कौतुक होत आहे.
——————————————————————
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याचे यश :
भूसंपादन होऊनही वर्षानुवर्षे मोबदला न मिळाल्याने शेतकर्यांना वेठीस धरले गेले होते.हा केवळ आर्थिक नव्हे तर,सामाजिक अन्याय होता. माझी ही आग्रही मागणी महसूल मंत्री नाम.चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मकपणे मान्य केली. तसेच तातडीने निर्णय घेऊन ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी तात्काळ स्वतंत्र लवाद नेमून, सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करुन व वेळेत सुनावण्या घेऊन निर्धारित काल मर्यादेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर थेट मोबदला जमा करण्याच्या सूचना दिल्या.हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याचे यश आहे.
– दीपकआबा
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने