महत्वाच्या बातम्या

डॉक्टर्स डे दिनानिमित्त सांगोला तालुका डॉक्टर्स असोसिएशनतर्फे डॉ.अमरसिंह शेंडे यांना “जीवन गौरव पुरस्कार” प्रदान

सांगोला :

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाबरोबरच सांगोला तालुक्यातील पहिले एम.एस.सर्जन म्हणून नावाजलेले प्रतिथयश डाॅक्टर डॉ.अमरसिंह शिवाजीराव शेंडे यांना सांगोला तालुका डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने सर्व डॉक्टरांच्या प्रमुख उपस्थितीत मेडिकल व सर्जरी क्षेत्रातील गौरवशाली कामगिरीबद्दल नुकताच “जीवन गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

सांगोला तालुका डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने सांगोला पंचक्रोशीतील सर्व डॉक्टर मंडळींच्या उपस्थितीत १ जुलै रोजी डॉक्टर्स डे उत्साहाच्या वातावरणात पार पडला.या डॉक्टर्स डे चे औचित्य साधून डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने डॉ.अमरसिंह शेंडे यांना “जीवन गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

                   डॉ.अमरसिंह शेंडे हे आजमितीस सांगोला पंचक्रोशीतील सर्जरी क्षेत्रातील भीष्म पितामह म्हणून ओळखले जातात.कोणत्याही ज्युनिअर सर्जनला आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यास ते नेहमी तत्पर असतात.आपत्कालीन परिस्थितीत कौशल्याने सर्जरी करुन हजारो रुग्णांना जीवनदान देणारे देवतुल्य डॉक्टर म्हणून डॉ.अमर शेंडे यांचे वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य आहे.

                     तसेच कला,क्रीडा,सांस्कृतिक,राजकीय, सामाजिक,कृषि व वैद्यकीय अशा सर्व क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांचा आधारवड म्हणूनही त्यांचा लौकिक आहे.वैद्यकीय व सर्जरी क्षेत्रांमधील डॉ.शेंडे यांच्या अतुलनीय कार्याची दखल घेऊन डॉक्टर्स असोसिएशनकडून डॉक्टर दिनाचे औचित्य साधून डॉ.शेंडे यांना सपत्निक “जीवन गौरव पुरस्कार” देवून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
——————————————————————————

आनंद हॉस्पिटल : पहिले आयएसओ मानांकन प्राप्त हॉस्पिटल :

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिला अतिदक्षता विभाग,पहिले सीटी स्कॅन सेंटर, पहिले सोनोग्राफी सेंटर,पहिले डायलिसिस युनिट,पहिले सुसज्ज ऑपरेशन थिएटर या सर्व वैद्यकिय सोईसुविधा डॉ.अमर शेंडे यांच्या आनंद हॉस्पिटलमध्येच कार्यरत झाल्या.सांगोला येथील आनंद हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिले आयएसओ मानांकन प्राप्त हॉस्पिटल आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button