महत्वाच्या बातम्या

ग्रामपंचायत कमलापूर येथे कायदेविषयक शिबीर संपन्न

 

सांगोला :

सांगोला तालुका विधी सेवा समिती व विधिज्ञ सेवा संघ,सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.८ मे रोजी सांगोला तालुक्यातील कमलापूर ग्रामपंचायत येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर पार पडले.

समाजातील प्रत्येक घटकातील प्रत्येक व्यक्तीला कायद्याचे ज्ञान प्राप्त व्हावे,याकरिता हे शिबीर भरविण्यात आले होते.या शिबीरामध्ये १ मे महाराष्ट्र दिन,१ मे जागतिक कामगार दिन,२२ मे आंतरराष्ट्रीय जैवविवीधता दिवस हे विषय निवडण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधीज्ञ संघाचे जेष्ठ सदस्य अॅड.व्ही.बी.चव्हाण यांनी केले.तर,या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधीज्ञ संघाचे सदस्य अॅड.व्ही.एस.बेले यांनी केले.

सदर कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे अध्यक्षस्थान सांगोला न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश श्रीमती बी.एम.पोतदार मॅडम यांनी भूषविले.या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून सांगोला दिवाणी न्यायालयाचे २ रे सहदिवाणी न्यायाधीश श्री.एस.एस.साळुंखे साहेब, सांगोला विधीज्ञ संघाचे अध्यक्ष एम.एन.ढाळे,सचिव अॅड.अजय तोरणे,सह सचिव श्रीमती एस.व्ही.बोत्रे, सांगोला पंचायत समितीच्या वतीने पुकळे साहेब, तोडकरी साहेब तसेच कमलापूर गावचे सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायतचे ग्रामसेवक खटकाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

दिवाणी न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीमती बी.एम.पोतदार मॅडम यांनी शिबारामध्ये उपस्थित नागरिकांना संबाेधित करताना शिबीरातील प्रत्येक विषयावर अतिशय उत्तम मार्गदर्शन केेले. तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणार्‍या महीलांचे हक्क व अधिकार अबाधित राखता यावेत,याकरिता बनविण्यात आलेल्या कायद्यांची माहीती दिली. कामगार दिनाचे महत्व समजावून सांगताना कामगारांकरीता बनविण्यात आलेले अनेक कायदे व योजनांची माहिती सांगितली.तसेच महाराष्ट्र दिनाचे महत्व सांगताना त्यांनी संंयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये शहीद झालेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण करुन दिले.  तसेच जैवविवीधता दिवसाचे औचित्य साधून प्रत्येकाने पर्यावरणाची काळजी घेतली पाहीजे,असे आवाहन यावेळी केले.

या शिबीरामधील १ मे महाराष्ट्र दिन या विषयावर बोलताना अॅड.टी.एम.टकले यांनी,१ मे १९६० रोजीची संयुक्त महाराष्ट्र चळवळ व तिचे कार्य नमूद केले.तसेच १ मे – हा केवळ एक दिवस नसून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला स्फूर्ती,चेतना व चैतन्य देणारा दिवस असल्याचे नमूद केले.या शिबीरामधील दुसरा विषय १ मे – जागतिक कामगार दिन हा होता.या विषयाचे महत्व सांगताना अॅड.एस.के.बनसोडे यांनी कामगार चळवळीचा उगम ते कामगारांकरिता बनविण्यात आलेल्या कायद्यांचे अतिशय उत्तम मार्गदर्शन केले. तसेच असंघटीत कामगारांना असणारे अनेक कायदे त्यांनी सांगून प्रत्येकाला कायद्याचे महत्व पटवून सांंगितले.

शिबीरामधील तिसरा व महत्वाचा विषय होता २२ मे – आंतरराष्ट्रीय जैवविवीधता दिवस या विषयावर विधीज्ञ संघाचे सदस्य अॅड.ई.डी.कमले यांनी मार्गदर्शन केले. आज बदलत्या वातावरणामध्ये बदल घडविण्यासाठी व पृथ्वीचा होणारा र्‍हास थांबविण्यासाठी प्रत्येकाने पाणी,हवा,झाडे यांचे संगोपन तसेच पृथ्वीवरील प्रत्येक जीवजंतूचे जैविक पध्दतीने जतन व संगोपन करणे काळाची गरज असल्याचे नमूद केले.

या कार्यक्रमास महिलांचाही भरघोस प्रतिसाद होता.या शिबीराचे आयाेजन केल्याबद्दल त्यांनी कमलापूर ग्रामपंचायतीचे सरपंच, रावसाहेब अनुसे,उपसरपंच, नितीन काळे,माजी सरपंच सौ.कलावती बंडगर,सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ व ग्रामसेवक यांचे आभार मानले.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विधीज्ञ संघाचे अध्यक्ष एम.एन.ढाळे यांनी केले.हा कार्यक्रम आयोजित करणेकामी न्यायालयातील कर्मचारी वाय.जी.तारे,पी.बी.शिंदे व संतोष शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button