महत्वाच्या बातम्या

राजमाता महिला सह.पतसंस्थेच्या चेअरमनपदी लतिका मोटे तर,व्हा.चेअरमनपदी दिपाली निंबाळकर

 

सांगोला :

        सांगोला येथील राजमाता महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणूकीत चेअरमनपदी श्रीमती लतिका दशरथ मोटे तर, व्हा. चेअरमनपदी दिपाली गणेश निंबाळकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आल्याचे प्रभारी सहाय्यक निबंधक ए.ए.शेख यांनी काल जाहीर केले.

त्याचबरोबर,या पतसंस्थेच्या नूतन संचालकपदी माजी नगराध्यक्षा राणीताई आनंदा माने,सिंधुबाई तानाजी भोकरे, राणी संजय माने, स्वप्नाली सुहास सादिगले,नकुशा दत्तात्रय जानकर,पूजा ज्ञानेश्वर गाडेकर,श्वेता प्रशांत धनवजीर,रेश्मा देविदास गावडे यांची तर,तज्ञ संचालिका म्हणून कविता सुधीर वाघ व जानकी दत्तात्रय घाडगे यांची निवड करण्यात आली.याप्रसंगी,पतसंस्थेच्या व्यवस्थापिका मनीषा हुंडेकरी, पल्लवी कांबळे,माधुरी दोडके या उपस्थित होत्या.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button