जागतिक महिला दिनानिमीत्त सांगोला नगरपरिषदेने आयोजित केल्या महिलांसाठी विविध स्पर्धा
सांगोला :
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. याचाच एक भाग म्हणून सांगोला नगरपरिषदेच्या वतीनेही शहरातील महिलांसाठी विविध स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पाककला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,महिलांचे ग्रुप डान्स स्पर्धा व होम मिनिस्टर यासारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.पाककला स्पर्धेसाठी शहरातील ५१ स्पर्धकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला.या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी,तालुका कृषी अधिकारी शिवाजीराव शिंदे व माजी प्रा.छाया यादव मॅडम यांनी काम पाहिले.या पाककला स्पर्धेतील यशस्वी स्पर्धक पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक स्नेहल मडके,द्वितीय क्र.श्रीम.स्वाती ढोले, तृतीय क्र.श्रीम.गीता दौंडे त्याचबरोबर, उत्तेजनार्थ श्रीम.अपर्णा येडगे, श्रीम.स्वाती गुळमिरे व श्रीम.शुभांगी तेली. रांगोळी स्पर्धेसाठी शहरातील ३५ स्पर्धकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला.या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून राजेंद्र जाधव सर,श्रीम.पल्लवी थोरात मॅडम व श्रीम.कविता पाटील मॅडम यांनी काम पाहिले.या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीम.रेश्मा दिवटे, द्वितीय क्र.श्रीम.वैजयंती दौंडे,तृतीय क्र.श्रीम.श्रध्दा तेली यांचा तर, उत्तेजनार्थ म्हणून श्रीम.गायत्री पाटणे,श्रीम.अश्विनी घोंगडे,श्रीम.कल्याणी बेडके यांचा क्रमांक आला.
नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रुप डान्स स्पर्धेत १० ग्रुप तर,प्रेक्षक म्हणून ५०० ते ६०० इतक्या महिला उपस्थित होत्या.या डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक जय हो ग्रुप,द्वितीय क्र.लयभारी ग्रुप, तृतीय क्र.शौर्य ग्रुप यांचा तर, उत्तेजनार्थ म्हणून शिवकन्या ग्रुप व मिलेनियम ग्रुप यांचा क्रमांक आला. यामध्ये परीक्षक म्हणून सतीश गेजगे सर व श्रीम.गौरी राऊत यांनी काम पाहिले. तसेच दि.१० मार्च रोजी होम मिनिस्टर,व्याख्यान व बक्षीस वितरण इ.कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी श्रीम.योजना मोहिते यांनी जागतिक महिला दिनानिमित्त “लिंग भेदभाव” याविषयावर सविस्तर व्याख्यान दिले.यावेळी होम मिनिस्टर या मजेदार खेळाच्या माध्यमातून ३ स्पर्धकांना पैठणी भेट देण्यात आली.
लकी ड्रॉच्या माध्यमातून उपस्थितांना विविध बक्षिसांचे वाटप करण्यात आले. उपरोक्त प्रथम,द्वितीय,तृतीय व उत्तेजनार्थ स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व बक्षीसाच्या रक्कमेच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्षा राणीताई माने,मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी,तालुका कृषी अधिकारी शिवाजीराव शिंदे,माजी उपनगराध्यक्षा स्वातीताई मगर, माजी नगरसेविका छायाताई मेटकरी,माजी नगरसेविका शोभाताई घोंगडे,सुनंदा घोंगडे (अध्यक्षा,कर्तव्य शहरस्तर संघ),कार्यालयीन अधीक्षक विजयकुमार कन्हेरे हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर निरीक्षक तृप्ती रसाळ,शहर समन्वयक,तेजश्री बगाडे,प्रतिभा कोरे,सहाय्यक प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे,समुदाय संघटक बिराप्पा हाके यांनी विशेष परिश्रम घेतले.
—————————————————————————
महिला सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी विविध कार्यक्रम राबवू :
शहरातील महिलांनी दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादामुळेच सदर कार्यक्रम यशस्वी होण्यास मदत झाली. यापुढेही नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरातील बचत गटातील व इतर महिलांसाठी सामाजिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याकरिता असे विविध कार्यक्रम राबविण्यात येतील.
– मुख्याधिकारी,डॉ.सुधीर गवळी
—————————————————————————
नगरपरिषदेने महिलांच्या कलागुणांना वाव मिळवून द्यावा :
नगरपरिषदेने महिलांकरिता जागतिक दिनानिमित्त घेतलेल्या विविध स्पर्धा या कौतुकास्पद आहेत. यापुढेही नगरपरिषदेने असे स्तुत्य उपक्रम राबवून महिलांच्या कला व गुणांना वाव मिळवून द्यावा,हीच अपेक्षा.
– माजी नगराध्यक्षा,राणीताई माने
—————————————————————————