महत्वाच्या बातम्या

सांगोला नगरपरिषदेमार्फत जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न

सांगोला :                   जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सांगोला नगरपरिषदेच्या वतीने दि.६,७ व ८ मार्च रोजी विविध स्पर्धा,कार्यशाळा,प्रशिक्षण व होम मिनिस्टर असे विवीध कार्यक्रम आयोजित करुन जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सांगोला नगरपरिषदेच्या वतीने दि.६ मार्च रोजी पाककला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही स्पर्धेंकरिता प्रत्येकी रुपये ५ हजार,३ हजार व २ हजार अनुक्रमे प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांकाकरिता ठेवण्यात आले होते.पाककला स्पर्धेमध्ये आफरीन पठाण,विद्या तेली,माधवी खडतरे व रांगोळी स्पर्धेमध्ये रेश्मा दिवटे,सुप्रिया दौंडे व गायत्री पाटणे या अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय बक्षीसांच्या मानकरी ठरल्या.

दि.७ मार्च रोजी महिलांच्या स्वयंरोजगारांच्या संधीमध्ये भर पडणेकामी ‘केमिकल फ्री फ्रुट पल्प प्रिझर्वेशन व फ्लोरल ड्रिंक्स (फुलांचे सरबत)’ या विषयावर गार्डन क्लब, कोल्हापूर यांचेमार्फत प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.यामध्ये बचत गटांच्या महिलांचा सहभाग लक्षणीय होता.तर,दि.८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त “होम मिनिस्टर” हा कार्यक्रम तसेच बक्षीस वितरण कार्यक्रम हा सांगोला शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन (टाऊन हाॅल) येथे संपन्न झाला.

                               या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी, सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी व सौ.तनुजाताई गवळी तसेच डॉ.सौ.निकिताताई बाबासाहेब देशमुख,लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष सौ.राणीताई माने,इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ.स्वातीताई अंकलगी,स्त्रीरोग तज्ञ डॉ.सौ.नेहा साळुंखे-पाटील,माजी नगरसेविका छायाताई मेटकरी, शोभाताई घोंगडे,रंजना बनसोडे,अप्सराताई ठोकळे व कर्तव्यदक्ष शहर संघाच्या अध्यक्षा सुनंदाताई घोंगडे इ.उपस्थित होते.

 उदघाटनप्रसंगी बोलताना नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी म्हणाले की,सांगोला नगरपरिषदे मार्फत नेहमी महिलांसाठी विविध कार्यक्रम राबवले जातात.यापुढेही महिलांसाठी स्वयंरोजगारासाठी व स्व:संरक्षणासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा मानस आहे,असे ते म्हणाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ.सौ.निकिताताई देशमुख म्हणाल्या की,महिलांनी स्वतःच्या आरोग्याबाबत नेहमीच तत्पर असले पाहिजे.तर माजी नगराध्यक्षा राणीताई माने म्हणाल्या की, महिलांसाठी आयोजित केलेल्या अशा कार्यक्रमास महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दाखवून कार्यक्रमाचा लाभ घेतला पाहिजे.तसेच स्त्रीरोग तज्ञ डॉ.नेहा साळुंखे- पाटील म्हणाल्या की,महिलांनी आपले मानसिक आरोग्य जपावे व त्यासाठी त्यांनी छंद जोपासले पाहिजेत.

याप्रसंगी,”होम मिनिस्टर” या कार्यक्रमाला महिलांनी अतिशय मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवून कार्यक्रमाच्या विविध खेळांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनुपमाताई गुळमिरे यांनी केले. “होम मिनिस्टर” या कार्यक्रमाच्या मानाच्या पैठणीच्या मानकरी सौ.प्रियांका भंडारे,सौ.पल्लवी कांबळे व सौ.मनीषा दिघे या अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाने विजयी ठरल्या.तसेच पाककला व रांगोळी स्पर्धेत विजेते व सहभागी या सर्वांना बक्षीस वितरण समारंभाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

सांगोला नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कर व प्रशासकीय अधिकारी श्रीमती अस्मिता निकम, कर निरीक्षक श्रीमती प्रियांका पाटील,श्री.रोहित गाडे,(कार्यालय अधीक्षक) श्री.सचिन पाडे,श्री.योगेश गंगाधरे तसेच नगरपरिषदेचे विभाग प्रमुख,अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button