महत्वाच्या बातम्या

शक्तीपीठ रद्द करणेबाबत आजीमाजी आमदार व तहसीलदार यांना शेतकऱ्यांचे निवेदन

सांगोला :

सांगोला तालुक्यातील नाझरे व वझरे येथील शेतकर्‍यांचा उदरनिर्वाह हा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असून येथील बागायती व कसलेल्या जमिनीतून शक्तीपीठ महामार्ग जात असल्यामुळे बाधित शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल होणार आहे, यासाठी हा महामार्ग रद्द करा, “एकच जिद्द,शक्तिपीठ रद्द”,हा नारा देत नाझरे व वझरे येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख,माजी आमदार शहाजीबापू पाटील,माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील व तहसीलदार संतोष कणसे यांना समक्ष भेटून याबाबतचे निवेदन दिले.

नाझरे गावापासून ४ कि.मी. अंतरावर नागपूर-रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्ग असून त्या मार्गास सदर शक्तिपीठ जोडावा.यासाठी येथून वेगळा शक्तीपीठ करण्याची गरज नाही व त्यामुळे आम्ही जमिनी देणार नाही,हा महामार्ग रद्द करा, अशी कळकळीची विनंती बाधित शेतकऱ्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी बाधित शेतकरी दादासो वाघमोडे,डॉ.सोनवणे, रविराज शेटे,दीपक शिरदाळे,दत्तात्रय बनसोडे,सचिन बनसोडे,संजय बनसोडे,गुरुलिंग पाटील,बाळासो सरगर,काशिनाथ पाटील,अल्लम प्रभू पाटील,दत्तात्रय देशपांडे,अशोक बनसोडे,महादेव बनसोडे आदी शेतकरी उपस्थित होते.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button