सांगोला :
सांगोला तालुक्यातील नाझरे व वझरे येथील शेतकर्यांचा उदरनिर्वाह हा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असून येथील बागायती व कसलेल्या जमिनीतून शक्तीपीठ महामार्ग जात असल्यामुळे बाधित शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल होणार आहे, यासाठी हा महामार्ग रद्द करा, “एकच जिद्द,शक्तिपीठ रद्द”,हा नारा देत नाझरे व वझरे येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख,माजी आमदार शहाजीबापू पाटील,माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील व तहसीलदार संतोष कणसे यांना समक्ष भेटून याबाबतचे निवेदन दिले.

नाझरे गावापासून ४ कि.मी. अंतरावर नागपूर-रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्ग असून त्या मार्गास सदर शक्तिपीठ जोडावा.यासाठी येथून वेगळा शक्तीपीठ करण्याची गरज नाही व त्यामुळे आम्ही जमिनी देणार नाही,हा महामार्ग रद्द करा, अशी कळकळीची विनंती बाधित शेतकऱ्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी बाधित शेतकरी दादासो वाघमोडे,डॉ.सोनवणे, रविराज शेटे,दीपक शिरदाळे,दत्तात्रय बनसोडे,सचिन बनसोडे,संजय बनसोडे,गुरुलिंग पाटील,बाळासो सरगर,काशिनाथ पाटील,अल्लम प्रभू पाटील,दत्तात्रय देशपांडे,अशोक बनसोडे,महादेव बनसोडे आदी शेतकरी उपस्थित होते.
——————————————————————————
More Stories
घरपट्टीत कसलीही दरवाढ नाही,ही तर वाढीव बांधकामामुळे करवाढ – नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने
दुष्काळी सांगोला तालुक्याला पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी त्वरित सोडावे – माजी आमदार दीपकआबा
स्व.आ.गणपतराव देशमुख यांच्या स्मृतीदिन व जयंती दिनानिमित्त सांगोल्यात विवीध कार्यक्रमांचे आयोजन