महत्वाच्या बातम्या

सांगोला विधानसभा मतदारसंघातील रस्ते दुरुस्तीसाठी ८ कोटी मंजूर – आम.शहाजीबापू पाटील

 

सांगोला :

सांगोला विधानसभा मतदारसंघातील रस्ते दुरुस्तीच्या ४ कामांसाठी सध्या नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यातून नव्याने ८ कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली.

सध्या नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यातून सांगोला विधानसभा मतदारसंघातील रस्ते दुरुस्तीच्या खालील ४ कामांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
(१) नरळेवाडी-वाकी रस्ता दुरुस्ती साठी १ कोटी रुपये (२) तांदूळवाडी- महीम रस्ता दुरुस्तीसाठी १ कोटी रुपये.
(३) धायटी-हलदहिवडी-गायगव्हाण रस्ता दुरुस्तीसाठी ३ कोटी आणि (४) चोपडी-हातीद-जुजारपूर रस्ता दुरुस्तीसाठी ३ कोटी रुपये,अशा चार कामांसाठी एकूण ८ कोटी रुपये नव्याने मंजूर झाले असून लवकरच या कामांचे अंदाजपत्रक तयार करुन निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या कामांना सुरुवात केली जाईल,अशी माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले की,मार्च २०२२ पासून आज पर्यंत विशेष रस्ता दुरुस्ती व बजेट मधील रस्ता दुरुस्तींच्या कामांसाठी एकूण ११८ कोटी रुपये मंजूर झाले असून एका वर्षामध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघातील रस्ते दुरुस्तीच्या कामांना मिळालेला हा सर्वाधिक निधी असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button