मुंबई :
निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असणार्या केवळ शेतीवरच विसंबून राहण्यापेक्षा अलिकडे, शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणात केले जात असून अशा शेतीपूरक व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगली कमाईही होत आहे.कुक्कुटपालन हा देखील असाच एक शेतीपूरक व्यवसाय असून हा व्यवसाय अलीकडे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात करत आहेत. विशेष म्हणजे, या व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनेही अनेक योजना कार्यान्वित केल्या असून “राष्ट्रीय पशुधन मिशन” या योजनेच्या माध्यमातून कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करण्यासाठी केंद्र सरकारकडून तब्बल २५ लाखांचे अनुदान मिळते. नाबार्डच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना कुकूटपालन व्यवसाय करण्यासाठी कर्जाची देखील सुविधा करून देण्यात आली असून शेतकरी बांधवांना राष्ट्रीय पशुधन मिशन या योजनेच्या माध्यमातून कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करण्यासाठी अनुदानाची देखील सोय शासनाने करून दिली आहे. मोठ्या स्तरावर कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करण्यासाठी या मिशनच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना २५ लाख रुपयापर्यंतचे अनुदान उपलब्ध करुन दिले जाते.
कुक्कुटपालनासाठी अनुदान :
देशभरात प्रथिनांचा वापर वाढत असून त्यासाठी आता अनेक लोक कोंबडी आणि अंड्यांवर अवलंबून आहेत. त्यामुळेच आता डेअरी फार्मप्रमाणेच पोल्ट्री फार्मही गांवोगांवी सुरू होत आहेत. विशेषत: शहरालगतच्या ग्रामीण भागात घराच्या मागच्या अंगणातही कुक्कुटपालन मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. कोंबड्यांच्या अनेक प्रगत जातींचे संगोपन करुन आता शेतकरी बांधव चांगले पैसे मिळवत आहेत. त्यामुळेच आता युवकही या कामात सहभागी होत आहेत. कुक्कुटपालनातील खर्च कमी करण्यासाठी राष्ट्रीय पशुधन अभियान योजना म्हणजेच राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत ५० टक्के किंवा कमाल २५ लाख रु. अनुदान देण्याची तरतूद आहे. या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही पोल्ट्री युनिट सुरु करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करु शकता. यासाठी तुम्ही https://nlm. udyamimitra.in वर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता.
कोंबडीच्या या जाती नफा वाढवतील :
कुक्कुटपालनातून चांगले पैसे मिळवण्यासाठी अशा जाती निवडा, ज्यांच्या मांस आणि अंड्याला देश-विदेशात जास्त मागणी आहे. दरम्यान, लक्षात ठेवा की, चांगल्या रोग प्रतिकारशक्ती असलेल्या जाती निवडा, ज्यामुळे रोगांचा धोका कमी होईल. यासोबतच पिलांच्या व्यवस्थापनाचे कामही सहज करता येईल. तज्ज्ञांच्या मते सील, कडकनाथ, ग्रामप्रिया, स्वरनाथ, केरी श्यामा, निर्भिक, श्रीनिधी, वनराजा, कारी उज्ज्वल आणि कारी या कोंबड्या आणि त्यांची अंडी बाजारात सहज विकली जातात.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने