मुंबई :
महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि आनंदाची बातमी असून शेतात जाण्यासाठी शेतरस्त्यांची नितांत आवश्यकता असते. ही आवश्यकता लक्षात घेवून शासनाकडून “मातोश्री योजना” सुरु करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून एक किलोमीटर रस्ता बनवण्यासाठी शेतकरी बांधवांना पूर्वी एक लाख रुपयांची मदत मिळत होती. मात्र, आता यामध्ये लवकरच वाढ केली जाणार असून शेतकरी बांधवांना शेत रस्ता बनवण्यासाठी आता, तब्बल २४ लाख रुपयांची मदत मिळणार असल्याची माहिती राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री ना.संदीपान भुमरे यांनी नुकतीच दिली आहे.
शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना चांगला शेतरस्ता असणे गरजेचे असते.शेतात जाण्यासाठी चांगला रस्ता नसेल तर, शेतकरी बांधवांना पेरणीपासून ते काढणीपर्यंत सर्व कामात अडथळे निर्माण होत असतात. शेतात जाण्यासाठी चांगला शेतरस्ता नसल्याने शेतकरी बांधवांना मजुरांची ने-आण करण्यासाठी व नांगरणीसारखी शेतीची कामे करण्यासाठी अडचण निर्माण होते. त्यामुळे, शेतमालाची ने-आण करण्यासाठी शेतरस्त्यांची नितांत आवश्यकता असते. मात्र, अनेकांना शेतात जाण्यासाठी शेतरस्ता नसतो. शेतकरी बांधवांची ही अडचण लक्षात घेवून “मातोश्री योजना” सुरु करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून एक किलोमीटर रस्ता बनवण्यासाठी शेतकरी बांधवांना यापूर्वी एक लाख रुपयांची मदत मिळत होती. मात्र, आता यामध्ये लवकरच वाढ केली जाणार असून शेतकरी बांधवांना शेत रस्ता बनवण्यासाठी आता, तब्बल २४ लाख रुपयांची मदत मिळेल. अद्याप शेत रस्त्यासाठी २४ लाख रु.मिळण्याची योजना महाराष्ट्रात कार्यान्वित नाही. मात्र, यावर शासन दरबारी विचार सुरु असल्याचे नाम.संदीपान भुमरे यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शिवाय,यापुढे शेतकरी बांधव तसेच शेतमजूर हा कोणत्याच योजनेपासून वंचित राहणार नाही, यासाठी कडक नियमावली केली जाईल,असेही मंत्री महोदयांनी स्पष्ट केले असून प्रत्येकाला जाण्यासाठी पक्का शेतीरस्ता हा पाहिजेच, असे मंत्रीमहोदयांनी सांगितल्याने आता शेतकरी बांधवांना रस्ता तयार करण्यासाठी २४ लाखांचा निधी मिळणार आहे. निश्चितच, ज्या शेतकरी बांधवांना शेतात जाण्यासाठी चांगला शेत रस्ता नाही, त्यांच्यासाठी ही एक आनंदाची आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे. यामुळे यापुढे शेतकरी बांधवांचा शेतात जाण्यासाठी रस्त्याचा प्रश्न हा कायमचा निकाली लागणार असून एकंदरीत, यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने