महत्वाच्या बातम्या

सांगोल्यात ११ ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन

सांगोला :

सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संकल्पनेतून राजर्षी शाहू महाराज क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ, चिकमहुद (ता.सांगोला) या संस्थेच्या वतीने सांगोला येथे रविवारी ११ ऑगस्ट रोजी इयत्ता पाचवी ते पदवी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या बेरोजगार तरुणांसाठी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या नोकरी महोत्सवात सुमारे ६० नामवंत कंपन्या सहभागी होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.

रोजगार निर्मिती,सक्षम व कुशल रोजगारक्षम युवा निर्मितीसाठी राजर्षी शाहू महाराज क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ,चिकमहूद यांच्या वतीने तसेच पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संकल्पनेतून नोकरी आपल्या दारी अंतर्गत इयत्ता पाचवी ते पदवी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या बेरोजगार तरुणांसाठी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत हर्षदा लॉन्स (मिरज रोड,सांगोला) या ठिकाणी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान नोकरी पूर्व मुलाखत प्रशिक्षण शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवारी ८ ऑगस्ट रोजी स्वेरी इंजीनियरिंग कॉलेज, गोपाळपूर,कर्मयोगी कॉलेज शेळवे येथे तसेच शुक्रवारी ९ ऑगस्ट रोजी फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेज,सांगोला व सह्याद्री फार्मसी कॉलेज,मेथवडे येथे तर,शनिवारी १० ऑगस्ट रोजी शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज, सांगोला व दीपकआबा साळुंखे- पाटील कॉलेज,कोळा या ठिकाणी नोकरीपूर्व मुलाखत प्रशिक्षण शिबीर संपन्न होणार असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली.
                 ————————————————————

नोकरी महोत्सवात नामवंत ६० कंपन्यांचा सहभाग :

या नोकरी महोत्सवात बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा,टाटा मोटर्स, झोमॅटो,अक्सिस बँक,डॉ.रेड्डीज फाऊंडेशन,इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक,फुकोकू इंडिया प्रा.लि.,क्विझ कॉर्प लि.,जिनियस ग्लोबल, पॉलीबाँड इंडिया लि.,रॉयल इन्फोटेक,यशस्वी ग्रुप,साई श्रध्दा इंटरप्रायजेस,युवाशक्ती फाऊंडेशन, एक्साईड बॅटरी,युनो मिंडा लि., इलेक्ट्रो टेक्नॉलॉजी लि.,युनीकेअर हेल्थ केअर,सुमित फॅसिलिटीज लि.,डी.एम.सी.फिनिशिंग प्रा.लि. यासह मॅन्युफॅक्चरिंग,इलेक्ट्रिकल, बँकिंग,सेल्स,रिटेल इंडस्ट्रीज,हॉटेल इंडस्ट्रीज,फार्मा,सिक्युरिटी,मार्केटिंग, ऑटोमोबाईल्स क्षेत्रातील नामवंत ६० कंपन्या सहभागी होणार आहेत. गरजू युवकांनी या नोकरी महोत्सवाचा लाभ घ्यावा,असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे. नोकरीसाठी ईच्छुक असलेल्या उमेदवारांना या नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून जास्तीत जास्त नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. 
                 ————————————————————

ऑनलाईनसह ऑफलाईन नोंदणीची सुविधा :

नोकरीसाठी ईच्छुक असलेल्या उमेदवारांनी क्यू आर कोड स्कॅन करावा. किंवा https://maharashtrajobfair.com/shahajibapupatil या वेब पेजवरील फॉर्म भरुन ऑनलाईन नोंदणी करावी. ज्या ईच्छुकांना ऑफलाईन नोंदणी करावयाची आहे, त्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयातील फॉर्म भरुन द्यावेत,असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button