महत्वाच्या बातम्याराजकीय

पुरोगामी युवक संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी डाॅ.बाबासाहेब‌ देशमुख यांची फेरनिवड

सांगोला :

                  शेतकरी कामगार‌ पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी यंदाही सांगोल्याचे युवा नेते डाॅ. बाबासाहेब देशमुख यांचीच वर्णी लागली असून शेकापच्या निवड समितीने पुन्हा एकदा पुरोगामी युवक संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची फेरनिवड केली‌ आहे.

भारतीय शेतकरी कामगार‌ पक्षाचे १९ वे अधिवेशन हे भाई संपतबापू पवार-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर येथे नुकतेच संपन्न झाले.या अधिवेशनामध्ये कांही राजकीय ठराव व प्रासंगिक ठरावही मांडून त्यास एकमताने सहमती घेण्यात आली‌.सदर अधिवेशनात शेतकरी कामगार पक्षाच्या व पक्षांतर्गत विविध आघाड्यावर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीही पार पडल्या.

शेतकरी कामगार पक्षात महत्वाचे मानल्या जाणार्‍या सरचिटणीस या पदावर माजी आमदार भाई जयंत पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.तसेच पुरोगामी युवक संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी दुसऱ्यांदा डाॅ.बाबासाहेब देशमुख यांची निवड करण्यात आली‌.  तर,कोल्हापूरचे जेष्ठ नेते भाई संपतबापू पाटील यांचे चिरंजीव भाई क्रांतीसिंह पवार-पाटील यांची पुरोगामी युवक संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

शेकापचा पुरोगामी विचार राज्यभर पोहचवण्याचे काम हे निवड झालेले पदाधिकारी करतील,असा विश्वास निवड समितीने यावेळी व्यक्त केला.तर,येणाऱ्या विधानसभेला या निवडीचा फायदा शेतकरी कामगार पक्षाला निश्चीतच होईल.भाई जयंत पाटील व भाई बाबासाहेब देशमुख यांच्या निवडीने शेतकरी कामगार पक्षात नवचैतन्य निर्माण झाले असल्याचे प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी सांगीतले.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button