सांगोला विधानसभा मतदारसंघात १९ उमेदवारांची माघार तर,१३ उमेदवार रिंगणात
सांगोला :
२५३-सांगोला विधानसभा मतदार संघात एकूण ३२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी दि.४ नोव्हेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी भैराप्पा माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संतोष कणसे तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांच्या उपस्थितीत त्यापैकी,एकुण १९ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने आता,१३ उमेदवार रिंगणात उतरले असल्याची माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत (पंचायत समिती,सांगोला) यांनी दिली.
सांगोला विधानसभा मतदार संघात एकूण ३२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी,त्यापैकी सुमारे १९ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने आता,१३ उमेदवार यंदाची निवडणूक लढविण्यास सज्ज झाले आहेत. सांगोल्यात खरी लढत ही आबा,बापू व बाबासाहेबातच होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सांगोल्यात आता भाजपा,शिवसेना (मुख्यमंत्री शिंदे गट) व राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजितदादा गट) यांच्या महायुतीकडून उभे राहिलेले शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार व विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांचेविरुध्द भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस,राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार गट) व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या महाविकास आघाडीकडून उभे राहिलेले उबाठा शिवसेनेचे अधिकृत उमेदवार माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांच्यातच प्रामुख्याने तिरंगी लढत होणार असून यंदा आमदारकीसाठी या तिघांमध्ये “काॅंटे की टक्कर” पहायला मिळणार आहे.
——————————————————————————
सांगोला विधानसभा मतदार संघात यंदाची निवडणूक लढविण्यास सज्ज असलेले उमेदवार :
१) दीपकआबा बापूसाहेब साळुंखे
२) शशिकांत सुब्राव गडहिरे
३) शहाजी राजाराम पाटील
४) डाॅ.बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख
५) राघू येताळा घुटूकडे
६) एकनाथ हनुमंत शेंडगे
७) परमेश्वर पांडुरंग गेजगे
८) बाळासाहेब गणपत देशमुख
९) बाळासाहेब नामदेव इंगोले
१०) मोहन विष्णू राऊत
११) रणसिंह विठ्ठल देशमुख
१२) राजाराम दामू काळेबाग
१३) ज्ञानेश्वर संभाजी उबाळे
अर्ज माघारी घेतलेल्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे :
१) राजरत्न जनार्दन गडहिरे – (लोटेवाडी – अपक्ष)
२) संजय वसंत पाटील (जैनवाडी – अपक्ष)
३) सोमा गुलाब मोटे (घेरडी – राष्ट्रीय समाज पक्ष)
४) अनिल बाळासो शेंडगे (शिरभावी – राष्ट्रीय समाज पक्ष)
५) हरिश्चंद्र विठोबा चौगुले (बामणी – अपक्ष)
६) संग्रामसिंह नेताजी पाटील (लक्ष्मी टाकळी – अपक्ष)
७) किरण तानाजी साठे (अकलूज – अपक्ष)
८) दत्तात्रेय राजकुमार टापरे (कडलास – अपक्ष)
९) धरती अतुल पवार (मेथवडे – अपक्ष)
१०) उमेश ज्ञानू मंडले (सांगोला – अपक्ष)
११) मारुती दगडू जाधव (पळशी – महाराष्ट्र राज्य समिती)
१२) विनोद बाबुराव बाबर (सांगोला – अपक्ष)
१३) संजय बिरु हाके (काळूबाळूवाडी – अपक्ष)
१४) गोविंद अंबादास कोरे (सांगोला – अपक्ष)
१५) डाॅ.अनिकेत चंद्रकांत देशमुख (सांगोला – अपक्ष)
१६) सुदर्शन मुरलीधर घेरडे (किडबिसरी – बळीराजा पार्टी)
१७) अतुल प्रभाकर पवार (मेथवडे – अपक्ष)
१८) हरिदास बापूसो वाळके (यादव) (आलेगाव – अपक्ष)
१९) धनाजी दत्तात्रय पारेकर (चोपडी – स्वराज्य निर्माण सेना)
——————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने