महत्वाच्या बातम्या

आता,विनापरवाना वृक्षतोड केल्यास प्रति झाड होणार ५० हजार रुपये दंड – वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर

सांगोला :

मालकी क्षेत्रातील झाडेतोड करणेबाबत महाराष्ट्र वृक्षतोड नियमन १९६४ च्या वृक्षतोडीच्या कायद्यात  (नियमात) आता सुधारणा करण्यात आली असून विनापरवाना वृक्षतोड केल्यास व वनविभागाचा परवाना न घेता झाडे तोड केली तर, एका झाडास तब्बल ५० हजार रुपये दंड भरावा लागणार असल्याचे परिपत्रक शासनाने काढले आहे. त्यासंबंधी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग (RNI MAHBIL/२००९/३५५३० सन १९६४ चा महाराष्ट्र अधिनियम ३४ च्या कलम ४ मध्ये सुधारणा करत) दि.६-९-२०२४ नुसार सुधारणा करण्यात आली असल्याची माहिती सांगोल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी दिली आहे.

         यापूर्वी सन १९६४ पासुन ते दि.५-९-२०२४ पर्यंत विनापरवाना झाडाची तोड केली तर,प्रति झाड फक्त १ हजार रुपये दंड आकारला जात होता.परंतु,महाराष्ट्र शासनाने दि.६-९-२०२४ पासून दंडाची रक्कम वाढवली असून आता, वनविभागाचा परवाना न घेता व विनापरवाना एक झाड तोडले तर, तब्बल ५० हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विनापरवाना वृक्षतोड करु नये. वनविभागाचा वृक्षतोड परवाना घेतल्यानंतरच वृक्षतोड करावी तसेच वन विभागाचा वाहतूक पास परवाना घेतल्यानंतरच वाहतूक करावी.

         झाडे तोडण्याबाबत महाराष्ट्र नियम १९६४ मधील कलम ३ अन्वये वृक्ष अधिकारी यांना हा दंड करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे.वृक्षअधिकारी यांनी चौकशी केल्यानंतर आणि अशा व्यक्तीस बाजू मांडण्याची संधी दिल्यानंतर ते दंड करु शकतात. सदरचा अधिनियम हा नागरी क्षेत्र वगळून संपुर्ण राज्यात लागू आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी व झाडे तोड बंद करण्यासाठी कठोर दंडाची तरतूद करण्यात आली असून महाराष्ट्र शासनाने प्रति झाड दंडाची रक्कम १ हजारावरुन ५० हजार रुपये अशी सुधारणा केली आहे.
                      ———————————————————

अवैध वृक्षतोड व अवैध वाहतूक होत असल्यास संपर्क साधा :

           वनविभागाचा वृक्षतोड परवाना व वाहतूक पास परवाना घेणे आवश्यक असून लोकांनी वनविभागाचा वृक्षतोड परवाना घेतल्यानंतरच वृक्षतोड करावी आणि वनविभागाचा वाहतूक परवाना घेतल्यानंतरच वाहतूक करावी तसेच अवैध वृक्षतोड किंवा अवैध वाहतूक होत असल्यास ९४२०३७८२७९ या नंबरवर संपर्क साधावा.
                    – वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button