शैक्षणिक

आकांक्षीत तालुका उपक्रमांतर्गत भीमनगर शाळेत लोकसहभागातून तिथी भोजन उत्साहात संपन्न

 

सांगोला :

सांगोला शहरातील जि.प.प्राथमिक शाळा भीमनगर येथे आकांक्षीत तालुका उपक्रमांतर्गत शुक्रवारी लोकसहभागातून तिथी भोजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

भीमनगर,सांगोला येथील जि.प.प्राथमिक शाळेत आकांक्षीत तालुका उपक्रमांतर्गत शुक्रवारी लोकसहभागातून आयोजित केलेल्या तिथी भोजनाच्या कार्यक्रमात सांगोला केंद्राचे केंद्रप्रमुख अस्लम इनामदार सर व अनुजा गायकवाड मॅडम उपस्थित होत्या.प्रारंभी,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अनुजा गायकवाड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना तिथी उपक्रम या कार्यक्रमाचे महत्त्व पटवून दिले व सकस आहाराबद्दल उत्तम मार्गदर्शन केले.लोकांचा सहभाग पाहून त्यांनी लोकसहभागातून शिक्षण साध्य होईल,असे सांगीतले.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी खूप मेहनत घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी या परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांनी भरभरुन आर्थिक सहकार्य केले.या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे,माजी नगरसेविका विजयाताई बनसोडे, बाबासाहेब बनसोडे,सामाजिक कार्यकर्त्या मैनाताई बनसोडे,रतन बनसोडे,एकनाथ बनसोडे,सुहास बनसोडे,नितीन रणदिवे (नाझरा),अमोल रा.बनसोडे, भरत आठवले,अमेय मस्के,विजय वाघमारे,अंगणवाडी शिक्षिका जयंतीताई बनसोडे व लक्ष्मी बनसोडे, अनिताताई काटे,कोमल ठोकळे,मंजुषा बनसोडे, भीमनगर व साठेनगर परिसरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व बहुसंख्येने उपस्थित असलेला पालक वर्ग या सर्वांचे खूप खूप सहकार्य लाभले,त्याबद्दल शाळेच्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापिका शेळके मॅडम,शिक्षिका मैना गायकवाड मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.
——————————————————————————

विद्यार्थ्यांनी घेतला दम बिर्याणीचा आस्वाद :

आकांक्षीत तालुका उपक्रमांतर्गत लोकसहभागातून आयोजित करण्यात आलेल्या तिथी भोजनाच्या कार्यक्रमासाठी भीमनगर व साठेनगर परिसरातील प्रतिष्ठित नागरिक एकनाथ बनसोडे,अमोल रा.बनसोडे, सुहास बनसोडे,नितीन रणदिवे (नाझरा),विजयाताई बनसोडे यांनी प्रत्येकी १ हजार रुपये तर,मैनाताई बनसोडे,रतनताई बनसोडे,जयंतीताई बनसोडे व लक्ष्मी बनसोडे यांनी प्रत्येकी ५०० रुपये तसेच अमोल बनसोडे यांनी १०० रु. व अंगणवाडी पालकांनी २५० रुपयांचे आर्थिक सहकार्य केले.लोकसहभागातून जमा झालेल्या या रकमेतून शाळेतील विद्यार्थ्यांना दम बिर्याणीचा मेनू दिला असता,शाळेतील सर्व मुलांनी दम बिर्याणीवर यथेच्छ ताव मारला आणि दम बिर्याणीचा आस्वाद घेतला.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button