भगवतभक्त शारदादेवी साळुंखे-पाटील घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचा शनिवारी दीपकआबांच्या हस्ते होणार बक्षीस वितरण समारंभ
सांगोला :
कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या “भगवतभक्त शारदादेवी साळुंखे- पाटील घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेला” सांगोला शहर आणि तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून हजारो महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी २८ सप्टेंबर रोजी आयोजित केला असल्याची माहिती कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉ.नेहा साळुंखे-पाटील यांनी दिली.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांवर कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बक्षीसांचा अक्षरशः पाऊस पाडण्यात आला असून प्रथम क्रमांकाच्या ५ विजेत्यांना आकर्षक पैठणी मिळतील तर,द्वितीय क्रमांकाच्या १० स्पर्धकांना मिक्सर मिळणार आहे.तृतीय क्रमांकाच्या १५ स्पर्धकांना कुकर मिळणार असून चतुर्थ क्रमांकाच्या २० स्पर्धकांना टिफीन बॉक्स मिळणार आहेत. याशिवाय,पाचव्या क्रमांकाच्या २५ स्पर्धकांना हॉटपॉट मिळणार आहेत. विशेष म्हणजे,या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलांना कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.
बक्षीस वितरण समारंभास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे- पाटील यांच्यासह सांगोला शहर व तालुक्यातील अनेक मान्यवर महिला व प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. तरी,शनिवार दि.२८ रोजी सांगोला येथील हर्षदा लॉन्स येथे दु. १.३० वा पार पडणाऱ्या बक्षीस वितरण समारंभास सांगोला शहर आणि तालुक्यातील या स्पर्धेत सहभागी झालेल्या महिला स्पर्धकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉ.नेहा साळुंखे-पाटील यांनी केले आहे.
——————————————————————————