सामाजिक

नाभिक समाजाला सर्वतोपरी मदत करु – आमदार शहाजीबापू पाटील

 

सांगोला :

राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक घेऊन नाभिक समाजासाठी स्थापन केलेले संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वित करुन निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करणार असून इतर सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी नाभिक समाजाला सर्वतोपरी मदत करु,असे आश्वासन आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिले.

सांगोल्यात सकल नाभिक समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण करण्यात आले होते.शासनाने नाभिक समाजासाठी स्थापन केलेले संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वित करुन अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ तयार करुन तसेच निधी उपलब्ध करुन हे महामंडळ कार्यान्वित करावे,या मागणीसाठी सकल नाभिक समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते.या उपोषण स्थळी आ.शहाजीबापू पाटील यांनी भेट देवून नाभिक समाजाच्या मागण्या जाणून घेतल्या. त्यानंतर नाभिक समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले की, नाभिक समाजासाठी स्थापन केलेले संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वित करुन निधी उपलब्ध करण्यासाठी तसेच इतर सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाची राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे.संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ स्थापन करण्याच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करुन महाराष्ट्रातील नाभिक समाजाला दिलासा दिला जाईल,असे आश्वासन आमदार शहाजीबापू पाटील यांनी सकल नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाला यावेळी दिले.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button