शैक्षणिक

सांगोला तालुक्यातील १५ केंद्रातून सुमारे पावणे पाच हजार विद्यार्थी देत आहेत १० वीची परीक्षा

 

सांगोला :

     राज्यात सर्वत्र गुरुवारपासून इयत्ता दहावीची परीक्षा सुरु झाली असून या परीक्षेसाठी सांगोला तालुक्यातील एकूण १५ केंद्रातून सुमारे पावणे पाच हजार म्हणजेच ४ हजार ७९१ पैकी ४ हजार ७६३ विद्यार्थी परीक्षा देत असल्याची माहिती परिरक्षक लक्ष्मीकांत कुमठेकर यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १० वी च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केल्यानुसार सांगोला तालुक्यातील एकूण १५ केंद्रातून या परीक्षा पार पडत आहेत. यामध्ये, सांगोला विद्यामंदिर हायस्कूलमधून ५९१ विद्यार्थी,कै.सौ.वत्सलादेवी देसाई विद्यालय,जवळे मधून ३६१, श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल,वाटंबरे-२७१,श्री.शिवाजी विद्यालय,महुद बु॥- ५०३,विद्यामंदिर हायस्कूल कोळा-४२४,न्यू इंग्लिश स्कूल, सांगोला-३६१,कडलास हायस्कूल,कडलास-१५४, कै. अभिजित कदम विद्यालय,मेथवडे-२६३,आनंद विद्यालय, कमलापूर-२४०,नाझरा विद्यामंदिर हायस्कूल,नाझरा-३०६, विद्यामंदिर हायस्कूल,वाकी-शिवणे- २५९,श्रीराम विद्यालय, हातीद-३३५,सावित्रीबाई फुले प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय, सोनंद-१६७,जवाहर विद्यालय,घेरडी-३११ तर,चिंचोली माध्यमिक विद्यालय,चिंचोली या शाळेतून २१७ विद्यार्थी असे एकूण १५ केंद्रातून ४ हजार ७६३ विद्यार्थी इयत्ता दहावीची परीक्षा देत आहेत.

सदर परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त पार पडण्यासाठी सांगोला तालुका शिक्षण विभागांतर्गत स्वतंत्र यंत्रणा सज्ज करण्यात आली असून प्रत्येक केंद्रनिहाय बैठे पथकाचीही नेमणूक करण्यात आली आहे.यामध्ये केंद्रप्रमुख व पदवीधर शिक्षक यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तसेच तहसीलदार व गटविकास अधिकारी यांचे विशेष भरारी पथकही कार्यरत असून या भरारी पथकाकडून परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देऊन तपासणी करण्यात येत आहे.गुरुवारी २ मार्च रोजी घेण्यात आलेला इयत्ता दहावीचा पहिला पेपर कॉपीमुक्त,सुरळीत व शांततेत पार पडल्याची माहिती परिरक्षक लक्ष्मीकांत कुमठेकर यांनी दिली.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button