महत्वाच्या बातम्या

कटफळ येथील मृत महिलांच्या नातेवाईकांचे खा.मोहीते-पाटील यांनी केले सांत्वन

सांगोला :

सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथे झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या कटफळ येथील महिलांच्या नातेवाईकांची नुतन खासदार धैर्यशील मोहीते-पाटील यांनी भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.

सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथे झालेल्या अपघातात कटफळ येथील ६ महिला एकाचवेळी मृत्यूमुखी पडल्या होत्या.या दुर्दैवी घटनेची माहिती समजताच माढा मतदारसंघाचे नुतन खासदार धैर्यशील मोहीते-पाटील यांनी काल मृत महिलांच्या नातेवाईकांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना शासनाकडून शक्य ती सर्व प्रकारची मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.

या अपघातग्रस्त महिलांच्या कुटूंबातील विद्यार्थ्यांनी मोहीते-पाटील शिक्षण संकुलात प्रवेश घेतल्यास त्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च संस्था करेल,असे आश्वासनही खा.धैर्यशील मोहीते-पाटील यांनी यासमयी दिले. यावेळी कटफळ व महुद जि.प.गटातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.                                             ————————————————————

भेटीदरम्यान दिल्या अधिकार्‍यांना सूचना :

यावेळी खासदार मोहीते-पाटील यांनी सांगोल्याचे तहसीलदार संतोष कणसे व मंगळवेढ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांचेशी दूरध्वनीद्वारे संपर्क करुन त्यांना सदर अपघातग्रस्त महिलांच्या नातेवाईकांच्या मदतीकरिता प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या.तसेच पंढरपूर-मल्हारपेठ महामार्गावरील धोक्याच्या ठिकाणी गतीरोधक बसविण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना दूरध्वनीवरुन सूचना दिली.त्याचबरोबर,कटफळ जवळ असलेल्या वन विभागाच्या हद्दीतून जाणार्‍या महामार्गाचे काम वनविभागाच्या परवानगीविना रखडले असल्यानेही अपघात होतात, असे स्थानिकांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर याबाबतीतही पाठपुरावा करुन हे काम मार्गी लावण्याचे आश्वासन खा.मोहीते-पाटील यांनी दिले.              ———————————————————————

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button